आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Biggest Impact On The Trade, Hotel And Transportation Sectors; Helping The Agricultural Economy; News And Live Updates

जीडीपी डेटा:व्यापार, हॉटेल आणि वाहतूक क्षेत्रावर सर्वात जास्त परिणाम; कृषीची अर्थव्यवस्थेला मदत

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चौथ्या तिमाहीत 8 पैकी 6 क्षेत्रे पॉझिटिव्ह झोनमध्ये, मात्र पहिल्या तिमाहीची घसरण पडली महाग

केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सोमवारी जीडीपीचा प्राथमिक डेटा जारी केला आहे. मार्च तिमाहीमध्ये जीडीपी विकास दर सकारात्मक झोनमध्ये परतला आहे. मात्र, वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये यात ७.३% च्या घसरणीचा अंदाज आहे. या घसरणीत ट्रेड, हॉटेल, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, ब्रॉडकास्ट सेवा क्षेत्राचे सर्वाधिक योगदान आहे. या क्षेत्राच्या जीव्हीएमध्ये १८.२% च्या मोठ्या घसरणीचा अंदाज आहे. दुसरीकडे, कृषी एकमेव असे क्षेत्र आहे, ज्यात गेल्या वित्त वर्षात चार तिमाहीत सकारात्मक वृद्धी प्राप्त केली आहे. या क्षेत्रात आलेल्या वार्षिक ३.६% वृद्धीमुळे जीडीपीत एकूण घसरण दोन अंकात जाण्यापासून वाचली.

वित्त वर्ष २०२०-२१ चा विचार केल्यास, कृषी आणि इलेक्ट्रिसिटी, गॅस, पाणीपुरवठा व अन्य युटिलिटी सेवेशिवाय आठपैकी सहा क्षेत्र नकारात्मक झोनमध्ये राहिले. ट्रेड, हॉटेल, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, ब्रॉडकास्ट सेवा क्षेत्रानंतर सर्वाधिक घसरण बांधकाम(८.६%) आणि खाण(८.५%) क्षेत्रात नोंदली आहे. मात्र, बांधकाम क्षेत्राने दुसऱ्या सहामाहीत चांगले पुनरागमन नोंदवले आहे. चौथ्या तिमाहीत(जानेवारी ते मार्च) या क्षेत्राने सर्वाधिक १४.५% ची तेजी दाखवली. चौथ्या तिमाहीत बांधकामच नव्हे तर अन्य क्षेत्रांत तेजी पाहायला मिळाली. ट्रेड, हॉटेल, ट्रान्सपोर्ट क्षेत्र व खाणीशिवाय सर्व क्षेत्रे चौथ्या तिमाहीत सकारात्मक झोनमध्ये परतली. चौथ्या तिमाहीत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रानेही उत्साहवर्धक ६.९% ची वृद्धी नोंदवली. अर्थव्यवस्थेत परतलेल्या तेजीत सरकारी खर्चाचे मोठे योगदान आहे.

अपेक्षेपेक्षा चांगले राहिले जीडीपी विकास दराचे आकडे
चौथ्या तिमाहीत वास्तविक जीव्हीएमध्ये ३.७% वृद्धी झाली. ही अंदाजित २.६% पेक्षा जास्त आहे. मोठ्या प्रमाणात सबसिडी देयकामुळे वास्तविक जीडीपीची वृद्धी १.६% राहिली. ही ०.६% वरून १% पूर्वानुमानापेक्षा चांगली आहे. कृषी, खाण आणि सामान्य प्रशासन, संरक्षण आदी सेवांची वृद्धी थोडी मंद राहिली. मात्र, अपेक्षेपेक्षा मोठा व्यापार, हॉटेल, वाहतूक, कम्युनिकेशन, ब्रॉडकास्ट सेवांनी याची भरपाई केली. औद्योगिक विकासात वृद्धी मोठ्या प्रमाणात अपेक्षेप्रमाणे राहिली. - निखिल गुप्ता, मुख्य अर्थतज्ज्ञ, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड

  • सलग चार तिमाहीत पॉझिटिव्ह झोनमध्ये राहणारे एकमेव क्षेत्र राहिले कृषी
  • बांधकाम क्षेत्राचे चौथ्या तिमाहीत दमदार पुनरागमन, १४.५%ची वृद्धी नोंदवली
  • खाण व व्यापार, हॉटेल, वाहतूक क्षेत्र चारही महिन्यांत नकारात्मक झोनमध्ये
बातम्या आणखी आहेत...