आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Challenge Of Competitors In AI; Google Calls Founders Like Larry Page For Special Help

नवी रणनीती:एआयमध्ये प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान; विशेष मदतीस लॅरी पेजसारख्या संस्थापकांना गुगलचे पाचारण

निको ग्रँट10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिन्यात गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका घेतल्या. विषय होता - प्रतिस्पर्धी कंपनीचा चॅटबॉट. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चे हे हुशार उत्पादन गुगलच्या १२ लाख कोटी रुपयांच्या सर्च व्यवसायासाठी वर्षांतील पहिला मोठा धोका असल्याचे दिसते. पेज आणि ब्रिन यांनी २०१९ मध्ये कंपनीचे दैनंदिन काम सोडले होते. मीटिंगमधील चर्चेची माहिती असलेल्या दोन लोकांनुसार, दोघांनी गुगलच्या एआय धोरणाचे पुनरावलोकन केले. त्यांनी योजनांना मंजुरी दिली व गुगलच्या सर्च इंजिनमध्ये अधिक चॅटबॉट वैशिष्ट्ये देण्याची कल्पना दिली. त्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सल्ले दिले. कंपनीचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्या निमंत्रणावरून गुगलच्या संस्थापकांची मदत घेण्यात आली आहे. कंपनीच्या अनेक उच्च अधिकाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि चॅटबॉट चॅटजीपीटीने उभ्या केलेल्या आव्हानाची जाणीव आहे, हे स्पष्ट आहे. ओपनएआय या छोट्या सॅन फ्रान्सिस्कोच्या कंपनीने दोन महिन्यांपूर्वी चॅटबॉट जारी केला. गुंतागुंतीच्या सिद्धांतांचे स्पष्टीकरण व नवकल्पनांच्या त्याच्या क्षमतेमुळे लोक चकित होतात. गुगलसाठी चॅटबॉट हा इंटरनेटवर माहिती शोधण्याचा सर्वात महत्त्वाचा नवीन मार्ग आहे.

नवीन तंत्रज्ञानाने गुगलच्या सामान्य कामकाजात बदल केला आहे. पिचाई यांनी सध्याच्या योजना सोडून एआयच्या विकासावर भर दिला आहे. यावर्षी वीसहून अधिक नवीन उत्पादने आणि चॅटबॉट वैशिष्ट्यांसह आपले सर्च इंजिन सादर करण्याचा गुगलचा मानस आहे. यासह गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट कर्मचारी कपात करत आहे. कंपनीने शुक्रवारी १२ हजार नोकऱ्या कापल्याची माहिती दिली आहे. गुगलचे माजी रिसर्च डायरेक्टर डी. शिवकुमार म्हणतात, हा काळ गुगलसाठी खूप आव्हानात्मक आहे. चॅटजीपीटी नवीन शोध अनुभव देते. ते म्हणतात की, गुगलने भूतकाळातही आव्हानांचा सामना केला आहे. स्पर्धात्मक राहण्यासाठी हे सर्व एआयवर जाईल. गुगलच्या मे महिन्यात होणाऱ्या परिषदेत सादर करण्यात येणाऱ्या काही नवीन उत्पादनांचा कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांनी विचार केला आहे. यामध्ये प्रतिमा तयार करण्यासाठी आणि संपादित करण्यासाठी इमेज जनरेशन स्टुडिओचा समावेश आहे. उत्पादनाच्या प्रोटोटाइपची चाचणी करणाऱ्या एआय टेस्ट किचन अॅपची तिसरी आवृत्तीही येऊ शकते. गुगल प्रतिमा निर्मिती तंत्रज्ञानासह सॉफ्टवेअर निर्माते आणि इतर कंपन्यांसाठी अनेक एआय प्रोग्राम आणेल. मेकरसूट हे स्वतःचे एआय प्रोटोटाइप बनवण्याचे साधन इंटरनेट ब्राउझरमध्ये आणण्याचीही तयारी सुरू आहे. अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी अॅप्स तयार करणे सोपे करण्यासाठी ते कोलाब प्लस अँड्रॉइड स्टुडिओ टूल्ससहदेखील येऊ शकते. आता सर्च इंजिनवरून लक्ष वळवून एआयवर फोकस... दैनंदिन काम सोडल्यापासून पेज आणि ब्रिन यांनी गुगलच्या ऑपरेशन्समध्ये कमीत कमी हस्तक्षेप करण्याचा दृष्टिकोन स्वीकारला आहे. पिचाई यांच्याकडे गुगल आणि अल्फाबेट चालवण्याचे काम दिले आहे. दुसरीकडे ते उडत्या कार कंपन्यांच्या प्रकल्पांमध्ये रस घेत आहेत आणि आपत्ती निवारणात मदत करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते नवीन प्रकल्पांची स्थिती जाणून घेण्यासाठी कंपनीच्या सिलिकॉन व्हॅली कार्यालयाला भेट देत आहेत. दोन्ही संस्थापक काही काळापासून सर्च इंजिनकडे लक्ष देत नव्हते. पण, त्यांना खूप पूर्वीपासून गुगलच्या उत्पादनात एआय आणायचे होते. गुगलचे माजी उपाध्यक्ष विक गंडोत्रा ​​आठवून सांगतात, “मी २००८ च्या आसपास पेजला नवीन ई-मेल वैशिष्ट्य दाखवले. परंतु, पेजने प्रभावित न होता विचारले, तो आपोआप ई-मेल का लिहू शकत नाही? गुगलने २०१४ मध्ये लंडनची आघाडीची एआय संशोधन लॅब डीप माइंड विकत घेतली.

बातम्या आणखी आहेत...