आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Cost Of Realty Will Increase; Banks Will Lose Rs 87,000 Crore, The Happiness Of Easy Money In The Country Is Over

रिझर्व्ह बँकेने बदलली भूमिका:रिअॅल्टीचा खर्च वाढणार; बँकांचे 87 हजार कोटी रुपये घटणार, देशात ईझी मनीचे सुख संपले

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेपो दरासह सर्व धोरणात्मक दरात ०.४० ते ०.५० % पर्यंत वाढ करण्याचा परिणाम प्रामुख्याने रिअल इस्टेट, ऑटोमोबाइल आणि बँकिंग या तीन क्षेत्रांवर होईल. यामध्येही रिअल इस्टेट क्षेत्राला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. खरं तर बहुतेक घरांची विक्री गृहकर्जाच्या मदतीने केली जाते आणि रेपो दर वाढीसह नवीन आणि जुन्या दोन्ही कर्जांचे व्याजदर वाढण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी बहुतेक कार कर्जाचे दर स्थिर आहेत. अशा स्थितीत केवळ नवीन कार कर्ज महाग होणार आहे.

बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणाले की, देशातील ईझी मनीचे पर्व संपले आहे. व्याजदरांच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेने सामान्य स्थिती पूर्ववत करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. हे चक्र काही काळ चालू राहील. ७% पेक्षा कमी व्याजदराचे गृहकर्जाचे पर्व आता संपणार आहे आणि नवीन कार कर्जाचे दरही वाढणार आहेत.

दर वाढल्याने तीन प्रमुख क्षेत्र प्रभावित होतील
1. रिअल इस्टेट : घर खरेदीचा खर्च वाढेल, विकासकांनाही फटका

अॅनाराॅक समूहाचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले की, आतापर्यंत व्याजदर ऐतिहासिकदृष्ट्या कमी पातळीवर होता, त्यामुळे महामारीच्या काळातही देशभरात घरांच्या विक्रीला वेग आला होता. आता कर्ज केवळ ग्राहकांसाठीच नाही तर बिल्डरांनाही महाग होणार आहे. त्यामुळे घर खरेदीचा खर्च वाढेल.

2. बँकिंग : कर्ज वितरणासाठी कमी पैसे शिल्लक राहतील
एचडीएफसी सिक्युरिटीजचे एमडी आणि सीईओ धीरज रेल्ली म्हणाले की, सीआरआरमध्ये ०.५०% वाढ झाल्याचा अर्थ बँक प्रणालीमधून ८७,००० कोटी रुपयांची रोकड रिझर्व्ह बँककडे जाईल. त्यामुळे बँकांची कर्ज वाटप करण्याची क्षमता कमी होईल. इतर क्षेत्रांनाही याचा फटका बसणार आहे. केवळ बँकांचे शेअर्सच घसरले नाहीत तर ऑटो, रिअल इस्टेटसारख्या इतर क्षेत्रांचे शेअर्सही घसरले आहेत.

3. ऑटो : कारला फटका, दुचाकीवर जास्त परिणाम
देशात महामारी सुरू झाल्यापासून वाहनांच्या किमती आधीच ३०% पेक्षा जास्त वाढल्या आहेत. आता त्यांना खरेदी करण्यासाठी कर्जही महाग होणार आहे. प्रदीर्घ प्रतीक्षा कालावधीमुळे पीव्ही सेगमेंटला फटका बसू शकतो, परंतु टू व्हीलर सेगमेंट कठीण परिस्थितीतून जात आहे. आधीच वाहने व पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत त्यात वाहन कर्जाच्या वाढत्या दराचा भार दुचाकी क्षेत्र सहन करू शकणार नाही.

बातम्या आणखी आहेत...