आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • The Country's Economy Is Improving, With Jobs In The Private Sector Back To Normal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासादायक:देशाच्या अर्थव्यवस्थेत होत आहे सुधारणा, खासगी क्षेत्रातील नोकऱ्या पुन्हा काेराेनापूर्व पातळीवर

वृष्टी बेनीवाल/ आनंद मेनन | नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमुळे 12 कोटी लोक बेरोजगार, 6 कोटी कामावर परतले

देशाच्या खासगी क्षेत्रात रोजगाराची स्थिती सुधारून पुन्हा लॉकडाऊन लागण्याआधीच्या स्तरावर येत आहे. तज्ज्ञांच्या मते, वर्षअखेरीस या क्षेत्रात रोजगार पुन्हा सुरुवातीला असलेल्या स्तरावर येईल. इतर खासगी कंपन्यांना कर्मचारी उपलब्ध करून देणारी क्वेस कॉर्प्स ही देशातील एक मोठी कंपनी आहे. कंपनीकडे लॉकडाऊनआधी ३,२५,००० कर्मचारी होेते, असा तिचा दावा आहे. ही संख्या गेल्या काही महिन्यांत घटून ५५,००० झाली. आता स्थिती सामान्य होत असून तिच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे.

१२ कोटी लोक बेरोजगार, ६ कोटी कामावर परतले

आकड्यांनुसार, एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमुळे १२.२ कोटी लोक बेरोजगार झाले होते, पण लॉकडाऊन उघडल्यानंतर काही महिन्यांतच ६ कोटी लोक कामावर परतले. बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्राची त्यात सर्वात मोठी भूमिका आहे.

मुख्य आकडे

48 कोटी काम करणारे लोक आहेत भारतात

22 कोटी लोक शेतात काम करतात

12 कोटी स्थलांतरित कामगार.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser