आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • The Deadline For Linking PAN Card With Aadhaar Was 31 March 2022, Earlier The Last Date Was Till 30 September; News And Live Updates

आपल्या कामाची बातमी:पॅन आधारसोबत लिंक करण्याच्या मुदतीत वाढ; जाणून घ्या नवीन डेडलाईन, यापूर्वी 30 सप्टेंबर शेवटची तारीख

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • एका मेसेजद्वारे करता येतील आधार-पॅन लिंक

केंद्र सरकारने पॅन कार्डशी आधार जोडण्याच्या तारीखेत पुन्हा एकदा वाढ केली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने ही 30 सप्टेंबर 2021 ही शेवटची तारीख दिली होती. परंतु, यामध्ये वाढ करत 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करत पॅन आधारसोबत जोडणी केली नाही तर मोठे नुकसान होऊ शकते. यामाध्यमातून तुमचे पॅन निष्क्रिय घोषित केले जाईल. निष्क्रिय पॅन वापरल्यास तुम्हाला 10,000 रुपये दंड होऊ शकतो. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी तुम्हाला 31 मार्च 2022 पर्यंत आधार-पॅन लिंक करणे गरजेचे आहे.

एका मेसेजद्वारे करता येतील आधार-पॅन लिंक

 • यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये UIDPAN टाईप करावे लागेल. यानंतर, तुम्हाला स्पेस देत तुमचा आधार क्रमांक आणि नंतर स्पेस देत पॅन क्रमांक टाकावा लागेल.
 • उदाहरणार्थ - UIDPAN 0000011112222 AAAPA7777Q 567678 किंवा 56161 वर पाठवायचे आहे.
 • यानंतर आयकर विभाग तुमचे दोन्ही नंबर लिंक करण्याच्या प्रक्रियेत ठेवेल.

ऑनलाइन लिंक करता येतील आधार-पॅन

 • सर्वप्रथम प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal भेट द्या
 • यामध्ये आधार लिंकचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यास एक नवीन पान उघडेल.
 • यामध्ये तुम्हाला पॅन नंबर, आधार क्रमांक आणि आधार कार्डमध्ये असलेले नाव टाका आणि नंतर आधार लिंकवर क्लिक करा.
 • यानंतर आयकर विभाग तुमचे दोन्ही नंबर लिंक करण्याच्या प्रक्रियेत ठेवेल.

पॅनला आधारशी लिंक करणे आवश्यक का आहे?

 • जर एखाद्या व्यक्तीने आपले पॅन आधारशी लिंक केले नाही तर त्याला अधिक टीडीएस भरावा लागेल.
 • जर पॅनला आधारशी लिंक केले नाही तर पॅन निष्क्रिय घोषित केले जाईल.
 • आधार-पॅन न जोडल्यामुळे तुमचे बँक खाते फ्रीज होऊ शकते.
 • जरी तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तरी आधारला पॅनशी जोडणे आवश्यक आहे.

लिंक न झाल्यावर पॅन होणार इन आॅपरेटिव्ह
सेबीने एक प्रेस रिलीज करत 31 मार्चपर्यंत आधारला पॅनशी लिंक करण्यास सांगितले आहे. जर तुम्ही आधारशी पॅन लिंक केले नाही तर तुमचा पॅन बंद होईल. जर पॅन नसेल तर कोणताही व्यवहार करता येणार नाही. सेबीने याबाबत कंपनीना तसे निर्देश दिले आहेत.

पॅन होणार निष्क्रीय
इनकम टॅक्स विभागाने म्हटले आहे की, जर एखाद्या पॅन होल्डर्सने आपले पॅन आधारला लिंक केले नाही तर तुमचे पॅन निष्क्रीय होईल. यानंतर तुमचे कोणतेही व्यवहार होणार नाही.

आधार-पॅन लिंक
31 मार्चपर्यंत पॅनकार्डला आधारशी लिंक करणे अनिवार्य केले असून तसे न केल्यास तुमचे पॅन निष्क्रिय होईल. नियमानुसार, जर तुमचे पॅन निष्क्रिय झाले असेल आणि तुम्ही ते बँक व्यवहारांसाठी किंवा इतरत्र वापरत असाल, तर तुम्ही ते पॅन कायद्यानुसार दिले नाही असे मानले जाईल. अशा परिस्थितीत तुमच्यावर इनकम टॅक्स कलम 272B अंतर्गत 10 हजारांपर्यत दंड आकारले जाऊ शकते. विशेष म्हणजे आता तुम्ही जर बँक खात्यातून 50 हजारांपेक्षा जास्त पैसे काढत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड दाखवावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...