आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ग्राउंड रिपोर्ट:मागणीत घट आणि मजुरांची वानवा रोखतेय वस्त्रोद्योग उत्पादनाचा वेग, कठीण काळातून जातोय देशातील सर्वात जुना व मोठा उद्योग

अहमदाबाद, चंदिगड, जयपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संकट: लॉकडाऊनमध्ये बहुतांश मजूर परतले आपापल्या घरी
Advertisement
Advertisement

अनलॉक-१ नंतर देशातील मोठे उद्योग हळूहळू बदलत आहेत आणि काही उद्योग वेगही पकडत आहेत. देशातील सर्वात जुन्या उद्योगात वस्त्रोद्योगाचाही समावेश आहे. मात्र, मागणीतील घट आणि सर्वात जास्त कामगार आधारित उद्योग असल्यामुळे अन्य उद्योगांच्या तुलनेत या उद्योगाला जास्त अडचणींचा सामना करावा लागत आहे. टाळेबंदीदरम्यान बहुतांश मजूर आपल्या गावी गेले आहेत आणि मागणीतही खूप घट आली आहे. अशा स्थितीत हवे असले तरी हा उद्योग ३५ ते ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन होत नाही. वार्षिक सुमारे २५ हजार कोटींची उलाढाल असणाऱ्या गुजरातच्या वस्त्रोद्योगात गेल्या ३ आठवड्यांत मॅन्युफॅक्चरिंग युनिट सक्रिय झाले आहेत. मात्र, मजुरांची वानवा असल्याने सध्या पूर्ण क्षमतेच्या ३५ टक्क्यांपर्यंतच उत्पादन होत आहे. देशात २० लाखांपेक्षा जास्त पॉवरलूम आहेत. यामध्ये जवळपास ६.५ लाख गुजरातमध्ये आहेत. यामध्येही एकट्या सुरतमध्ये ४.५ लाख पॉवरलूम युनिट आहेत. 

अहमदाबाद टेक्स्टाइल असोसिएशनचे उपाध्यक्ष नरेश वर्मा यांच्यानुसार, कोरोना संकटामुळे पूर्ण व्हॅल्यू चेन विस्कळीत झाली आहे. येत्या दाेन ते तीन महिन्यांपर्यंत मजूर परत येण्याची स्थिती नाही. राजस्थानचे टेक्स्टाइल हब भिलवाड्यातही मजुरांच्या कमतरतेमुळे वस्त्रोद्योगास वेग पकडण्यास अडचणी येत आहेत. भिलवाड्याच्या ३६० विणकरी, १८ स्पिनिंग आणि ४ डेनिम मिल आणि १८ प्रोसेस हाऊसमध्ये ८० टक्क्यांमध्ये उत्पादन सुरू केले आहे. मात्र, मजूर आणि मागणीत घट झाल्याने उत्पादन क्षमतेच्या ५० टक्केच होत आहे. भिलवाड्याचे वस्त्रोद्योग युनिट दरमहा ८ कोटी मीटरपेक्षा जास्त कापडाचे उत्पादन करते हे इथे उल्लेखनीय आहे. भिलवाड्याचा मयूर, संगम आणि बीएसएलसारख्या ब्रँडने राष्ट्रीय स्तरापर्यंत ओळखू निर्माण केली आहे. एक अन्य प्रमुख टेक्स्टाइल हब पंजाबच्या लुधियानातही १५०५० वस्त्रोद्योग बंद पडले आहेत. यामध्ये ५० टक्के होजियरीशी संबंधित आहेत, जे सध्या हिवाळ्यासाठी उबदार कपडे तयार करते. या वेळी मजुरांच्या कमतरतेमुळे येथील काम थांबले आहे. पंजाबच्या उद्योग संघटनेच्या म्हणण्यानुसार, या वेळी औद्याेगिक युनिट्समध्ये मजुरांचा तुटवडा आहे.

निर्यात ३५ टक्के घसरण्याची शक्यता

मार्चमध्ये पूर्ण झालेल्या तिमाहीत देशाच्या कापड निर्यातीत १३ % घसरण नोंदली आहे. एप्रिलमध्ये यामध्ये ६०% घसरण आली आहे. या वित्त वर्षात तयार कपड्यांच्या निर्यातीत ३० ते ३५ %पर्यंत घसरणीची शक्यता आहे. गतवर्षी भारताने २.७० लाख कोटी रुपयांची निर्यात झाली.

सरकारने आम्हाला दिलासा द्यावा

वस्त्रोद्योग गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. कोरोना संकटामुळे मागणी कमी झाली आहे. सरकारला वस्त्रोद्योगाला दिलासा देण्याबाबत विचार केला पाहिजे, ज्यामुळे लाखो लाेकांना रोजगार मिळेल. - अर्पण शहा, चेअरमन, गुजरात गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग असो. 

कापड उद्योगात तेजी येण्यास वेळ लागेल

भिलवाड्यात लोअर, मीडियम आणि प्रीमियम म्हणजे सर्व प्रकारच्या कपड्यांचे उत्पादन होत आहे. १५ हजार मजुरांची घरवापसी व मागणी घटल्याने कापड उद्योग क्षमतेच्या ५० %वापर करत आहे. या उद्योगाला वेग पकडायला सध्या वेळ लागेल. - आर. के. जैन, सरचिटणीस, मेवाड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री

Advertisement
0