आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • The Economy Of The Country Recovering From The Decline; Strong Signs Are Visible In Many Areas

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्लेषण:घसरणीतून सावरतेय देशाची अर्थव्यवस्था; अनेक क्षेत्रांत दिसताहेत बळकट संकेत

अनिर्बान नाग| नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आठ हाय फ्रिक्वेन्सी इंडिकेटर्सपैकी पाचमध्ये सुधारणा, तीन स्थिर
  • सेक्टरमध्ये समग्र हालचाली व ऑर्डर बुकमध्ये वेगवान विस्तार दिसत आहे

भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या सप्टेंबर महिन्यापासून वेग पकडला आहे. मागणीत आलेल्या तेजीमुळे व्यावसायिक हालचालींत वाढ झाली आहे आणि यामुळे देशाला कोरोना महारोगराईमुळे निर्माण झालेल्या मंदीतून बाहेर पडण्यास मदत मिळेल. ब्लूमबर्गद्वारे ट्रॅक केलेल्या आठ हाय फ्रिक्वेन्सी इंडिकेटर्सपैकी पाचमध्ये गेल्या महिन्यात सुधारणा दिसत आहे, तर तीन इंडिकेटर स्थिर आहेत. यामुळे आर्थिक संकटावेळी लोकांच्या वित्तीय निर्णयांचे मापन करणाऱ्या तथाकथित “अॅनिमल स्पिरिट’ डायलवर सुईनेही गती पकडली आहे आणि ही ४ वरून ५ वर पोहोचली आहे. मार्चमध्ये लावलेल्या कठोर टाळेबंदीनंतर लोक पुन्हा खरेदी करत आहेत.

निर्यात : सप्टेंबरमध्ये शिपमेंटमध्ये ६% ची वृद्धी झाली. कृषी उत्पन्न आणि फार्माशिवाय अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनांतील सुधारणेमुळे मदत मिळाली आहे. या दरम्यान व्यापार तुटीचे अंतरही कमी झाले.

निर्मिती क्षेत्र : निर्मिती पीएमआय ५६.८ वर पोहोचला आहे. हा जाने. २०१२ नंतर सर्वाधिक उंचीवर आहे. आयएचएस मार्केटनुसार, वर्क ऑर्डरमध्ये वाढ हे या मागचे कारण आहे.

व्याव. हालचाली : भारताच्या सेवा क्षेत्रातील हालचालीत सुधारत आहेत. ऑगस्टमध्ये ४१.८ च्या तुलनेत वाढून ४९.८ वर पोहोचल्या आहेत. एप्रिलमध्ये हा विक्रमी नीचांकी ५.४ पातळीवर होता.

पायाभूत सुविधा उद्योग : पायाभूत सुविधा उद्योगांतील उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑगस्ट २०२० मध्ये ८.५% कमी राहिले आणि हे जुलै २०२० च्या ८% च्या तुलनेत थोडा खराब राहिला. यात एप्रिलमध्ये विक्रमी ३७.९%ची घसरण नोंदली.

औद्योगिक उत्पादन : ऑगस्ट २०२० मध्ये औद्योगिक उत्पादन ८% घसरले. हे जुलैच्या घसरणीपेक्षा कमी आहे. भांडवली वस्तूचे उत्पादन १५.८% घसरले. हे महिनाभरापूर्वीच्या २२.८% घसरणीपेक्षा कमी आहे.

कर्जात वाढ : आरबीआयनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत सप्टें. २०२० मध्ये क्रेडिट ग्रोथ ५.२% राहिली. जी गेल्या महिन्याच्या ५.५% च्या तुलनेत कमी व गेल्या वर्षीच्या वृद्धीदरापेक्ष निम्मी राहिली.

ग्राहक हालचाली : मागणीचे एक प्रमुख संकेतक प्रवासी वाहनाची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत सप्टेंबर २०२० मध्ये २६.५% वाढली आहे. किरकोळ विक्रीनेही स्थिरतेचे संकेत दिले आहेत.