आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The ED Called Google Officials And Asked Them For A Detailed List Of Micro lending Apps Operating In The Country.|Marathi News

झटपट कर्ज अ‍ॅप घोटाळा:ईडीने गुगलच्या अधिकाऱ्यांना बोलावले, त्यांच्याकडून देशात कार्यरत असलेल्या सूक्ष्म-कर्ज देणाऱ्या अ‍ॅप्सची तपशीलवार यादी मागवली

हैदराबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅप आधारित झटपट कर्ज फसवणूक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुगलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून देशात कार्यरत असलेल्या सूक्ष्म-कर्ज देणाऱ्या अॅप्सची तपशीलवार यादी मागवली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा सर्व मोबाइल अ‍ॅप्सची चौकशी करण्यासाठी गुगलच्या अधिकाऱ्यांना ईडीच्या हैदराबाद कार्यालयात बोलावण्यात आले होते, जेणेकरून ते गुगल प्ले स्टाेअरद्वारे सत्यापित केले जाऊ शकेल.

ईडीआधीच ३८ एनबीएफसी आणि ३०० पेक्षा जास्त फिनटेक कंपन्यांची मनी लाँड्रिंगविरोधी कायद्यांतर्गत चौकशी करत आहे. या मायक्रो-फायनान्स कंपन्या मोबाइल अ‍ॅप्सद्वारे लहान कर्जे वितरित करतात आणि कर्जदारांकडून खूप जास्त व्याज आकारतात. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये देशाबाहेर पाठवण्यात आल्याचा ईडीचा संशय आहे. या फिनटेक कंपन्यांमध्ये चिनी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या कंपन्यांनी निष्क्रिय एनबीएफसीसोबत सामंजस्य करार करून कामगिरी हमीच्या नावावर सुरक्षा ठेवी जमा केल्या आहेत. पेटीएम, रेझर पेसारख्या पेमेंट गेटवेद्वारे या एनबीएफसी स्वतंत्र व्यापारी आयडी तयार करतात.

बातम्या आणखी आहेत...