आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Entire Business Of The Adani Group Is Still Smaller Than One sixth Of Reliance; News And Live Updates

दिव्य मराठी इनसाइट:​​​​​​​अदानी समूहाचा संपूर्ण व्यवसाय अद्यापहीरिलायन्सच्या सहाव्या हिश्श्यापेक्षाही छोटा; बाजार भांडवलाच्या आधारावर उद्योगांची तुलना निरर्थक का?

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये नुकत्याच आलेल्या घसरणीआधी उद्योगपती गौतम अदानी लवकरच रिलायन्स समूहाचे चेअरमन आणि देशाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना मागे टाकत देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होतील अशी चर्चा होती. वास्तवात अदानी समूह एवढा मोठा झाला आहे, जो देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्सला मागे टाकण्याच्या स्थितीत आहे? याचे उत्तर नाही. उद्योगपतींच्या स्थितीसाठी त्यांची कंपनी बाजार भांडवलाच्या एकमेव मानकामुळे हा गैरसमज होतो. बाजार भांडवलाऐवजी व्यवसायाचे वास्तविक आकडे उदा. समूहाचा महसूल, शुद्ध नफा, कर्ज आदींवर विचार केल्यास बहुतांश आघाड्यांवर अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांची स्थिती रिलायन्ससमोर अद्यापही कमी आहे.

उदाहरणार्थ अदानी समूहाचा एकूण महसूल रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षा साडेसहा पट कमी आहे. याच पद्धतीने दोन्ही समूहांच्या शुद्ध नफ्यातही साडेसहा पटीपेक्षा जास्त अंतर आहे. याहून अधिक रिलायन्स आता कर्जमुक्त कंपनी आहे. अदानी समूहावर १.४१ लाख कोटी रुपयांचे मोठे कर्ज आहे. अल्टामाउंट कॅपिटल मॅनेजमेंटचे संचालक प्रकाश दिवाण यांच्यानुसार, बाजार भांडवल कोणत्या कंपनीचे मूल्य नसते. एखाद्या कंपनीचे शेअर वधारल्यामुळे तिचे बाजार भांडवल वाढल्यास कंपनीचे मूल्य वाढले असा कदापि अर्थ होत नाही. उदा. २० रु. किमतीच्या काेणत्याही वस्तूची मागणी अचानक वाढली आणि ती ५० रुपयांत विकली तर त्या वस्तूचे मूल्य वाढत नाही.

याच पद्धतीने एलकेपी िसक्युरिटीजचे रिसर्च हेड एस. रंगनाथन म्हणाले,कोणती कंपनी किती मोठी वा चांगली याचा अंदाज बांधण्यासाठी बाजार भांडवलाशिवाय अन्य मानकांवर लक्ष दिले पाहिजे. त्यात बाजारात कंपनीची पोहोच, ग्लोबल फुटप्रिंटचा समावेश आहे.इंडस्ट्रीजपेक्षा साडेसहा पट कमी आहे. याच पद्धतीने दोन्ही समूहांच्या शुद्ध नफ्यातही साडेसहा पटीपेक्षा जास्त अंतर आहे. याहून अधिक रिलायन्स आता कर्जमुक्त कंपनी आहे. अदानी समूहावर १.४१ लाख कोटी रुपयांचे मोठे कर्ज आहे. अल्टामाउंट कॅपिटल मॅनेजमेंटचे संचालक प्रकाश दिवाण यांच्यानुसार, बाजार भांडवल कोणत्या कंपनीचे मूल्य नसते.

एखाद्या कंपनीचे शेअर वधारल्यामुळे तिचे बाजार भांडवल वाढल्यास कंपनीचे मूल्य वाढले असा कदापि अर्थ होत नाही. उदा. २० रु. किमतीच्या काेणत्याही वस्तूची मागणी अचानक वाढली आणि ती ५० रुपयांत विकली तर त्या वस्तूचे मूल्य वाढत नाही. याच पद्धतीने एलकेपी िसक्युरिटीजचे रिसर्च हेड एस. रंगनाथन म्हणाले,कोणती कंपनी किती मोठी वा चांगली याचा अंदाज बांधण्यासाठी बाजार भांडवलाशिवाय अन्य मानकांवर लक्ष दिले पाहिजे. त्यात बाजारात कंपनीची पोहोच, ग्लोबल फुटप्रिंटचा समावेश आहे.

अदानीच्या ३ कंपन्यांत सलग तिसऱ्या दिवशी लोअर सर्किट
अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. समूहाच्या तीन कंपन्यांमध्ये अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅसच्या शेअरमध्ये तिसऱ्याही दिवशी ५% चे लोअर सर्किट लागले. अदानी पॉवरचे शेअर ४.९७% घसरून १२७.२५ रुपयांवर आल्यावर त्यात ५% चे लोअर सर्किट लागल्याने व्यवसाय रोखला गेला.

याच पद्धतीने अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅसचे शेअरही अनुक्रमे १,३६९.३५ आणि १,३९४ रुपयांवर आल्यावर यातही ५% चे लोअर सर्किट लागल्याने ट्रेडिंग रोखली. याशिवाय अदानी पोर्ट्‌स अँड एसईझेडचे शेअर ७.१७% घसरून ७०६.८५ रुपयांवर बंद झाले. अदानी एंटरप्रायजेसच्या शेअरमध्ये ५.७७% ची घसरण राहिली. हा १,४४९.३० रुपयावर बंद झाला. अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर ३.१०% नुकसानीसह १,१७१.२५ रुपयांवर बंद झाले.

बातम्या आणखी आहेत...