आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • The Era Of Government Control Over Coal Mining Is Over; Mines Received By 2 Companies

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासगीकरण:कोळसा खाणीत सरकारी नियंत्रणाचे युग संपले; 2 कंपन्यांना मिळाल्या खाणी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वेदांता आणि हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड कंपन्यांचा सहभाग

भारतातील आघाडीची अॅल्युमिनियम आणि तांबे उत्पादक कंपन्या वेदांता आणि हिंदाल्को इंडस्ट्रीज लि. पहिल्या दिवशी खासगी कंपन्यांसाठी कोळसा खाणींच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी झाल्या. यासोबत कोळसा खाणींत अनेक दशकांपासून सुरू असलेल्या सरकारी नियंत्रणाच्या समाप्तीची सुरुवात झाली. कोळसा मंत्रालयाने सांगितले की, अनिल अग्रवाल यांच्या वेदांताने पूर्व ओडिशाच्या राधिकापूर पश्चिम खाणीसाठी आपल्या महसुलातील २१% भागीदारीचा प्रस्ताव दिला आहे. कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्कोने १४.२५% महसूल भागीदारीची बोली लावली, जी शेजारी झारखंड राज्यातील चकला खाणीसाठी सर्वाधिक होती.

लिलाव जिंकणाऱ्या या कंपन्यांना आपल्या पट्ट्यात कोळशासाठी खोदकाम करणे आणि विक्रीची परवानगी राहील. ही सध्या सरकारी कंपन्यांकडे होती. लिलाव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारद्वारे प्रमुख सुधारणांच्या रूपात पाहिला जात आहे आणि हा भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोना झटक्यातून सावरण्यासाठीच्या प्रमुख उपायांपैकी एक सांगितला जातो. भारतात कोळसा देशात भलेही हवामान बदल उद्दिष्टांत अक्षय्य ऊर्जेला प्रोत्साहन दिले जात असले तरी देशातील उपलब्धता, स्वस्त ऊर्जा पर्याय आणि याच्या ऊर्जा अावश्यकतांसाठी एक महत्त्वाचा भाग म्हणून पाहिले जाते. वेदांताने घेतलेल्या राधिकापूर पश्चिम खाणीत ३१.२ कोटी टनांचा साठा आहे. चकला खाण हिंदाल्कोने घेतली आहे. त्यात ७.६ कोटी टन कोळसा साठा आहे. अन्य खाणींसाठी लिलाव ९ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील.