आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Era Of The Supremacy Of Big Tech Companies Is Coming To An End; Shares Fell 25% In 8 Months

व्यवसाय:मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या श्रेष्ठत्वाचे युग अस्ताकडे; 8 महिन्यांत शेअर्स 25% घसरले

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२००५ पासून अमेरिकेच्या जीडीपीमध्ये डिजिटल कंपन्यांचा वाटा एकतृतीयांशवरून १०% झाला आहे. अमेरिकेतील मेटा, अल्फाबेट, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि अॅपल (एमएएएमए) या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या यापेक्षाही अधिक वेगाने वाढल्या आहेत. एमएएएमए कंपन्यांचे उत्पन्न आणि नफा गेल्या दहा वर्षांत सुमारे २०% वार्षिक वाढला आहे, तर अमेरिकेचा वार्षिक जीडीपी वाढीचा दर ४% पेक्षा कमी होता. कोविड-१९ मुळे चहुबाजूंनी नुकसान झाले, पण मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी विक्रमी नफा कमावला आहे. या वर्षी गुरुत्वाकर्षणाच्या नियमांनी त्यांची उपस्थिती पुन्हा जाणवून दिली. तंत्रज्ञान कंपन्यांनी समृद्ध नॅसडॅक शेअर बाजाराचा निर्देशांक जानेवारीपासून २५% खाली आला आहे. कमाई अल्प वाढ आणि उच्च व्याजदरांनी मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना मागे ओढले आहे.

पुरवठ्यात अचानक खंड, कामगारांचा तुटवडा, पूर्वीच्या कंपन्यांच्या सीईओंना सामोरे जावे लागलेली स्पर्धा या समस्यांना तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना तोंड द्यावे लागले. या अडचणी एमएएएमए कंपन्यांसाठी वेगळ्या आहेत. चीनमध्ये लॉकडाऊनमुळे अॅपल, अॅमेझॉनसमोर अडचणी आहेत. तंत्रज्ञान उद्योगाची आणखी एक मर्यादा म्हणजे कुशल कामगार. तंत्रज्ञान कंपन्यांकडे कधीही चांगल्या प्रोग्रामरची कमतरता नव्हती, पण आता कर्मचाऱ्यांची भरती करणे त्यांना कठीण जात आहे. त्यांना इतर उद्योगांमधूनही तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागते. तथापि, तंत्रज्ञानाचे बादशहा आजपर्यंत आपली जादू दाखवू शकले नाहीत असे आणखी एक क्षेत्र आहे. अॅमेझाॅनने गेल्या महिन्यात वन मेडिकल ही अमेरिकन मेडिकल कंपनी ३० हजार कोटींना विकत घेतली आहे. जिंकण्यासाठी राहिलेल्या एकमेव डिजिटल मार्केटमध्ये प्रवेशाचा हा एक नवा प्रयत्न आहे. ऑगमेंटेड रिअॅलिटी तंत्रज्ञानावर उद्योगाच्या आशा आहेत. नवीन बाजारपेठ निर्माण झाली नाही तर कदाचित मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचे विलक्षण युग संपेल. अल्फाबेटचा जाहिरात महसूल ४९% घटला ऑनलाइन जाहिराती घटल्यामुळे उद्योग क्षेत्रातील दिग्गजांच्या शेअरच्या किमतींवर दबाव आला आहे. २६ जुलै रोजी अल्फाबेटने १३% ची तिमाही वाढ नोंदवली. हे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ६२% पेक्षा खूपच कमी आहे. २७ जुलैला मेटाने त्याची कमाई प्रथमच कमी झाल्याचे सांगितले. अॅपलने गेल्या वर्षी आयफोनच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये केलेल्या बदलाचा परिणाम जाहिरातींच्या बाजारावरही झाला आहे. दुसरीकडे अल्फाबेट आणि मेटाला कडव्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. टिकटाॅक हा चिनी कंपनीचा व्हिडिओ प्लॅटफॉर्म सोशल मीडियावर अमेरिकन लोकांचे लक्ष वेधून घेत आहे तसेच जाहिरातीही मिळवत आहे.

बातम्या आणखी आहेत...