आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आशियातील २० श्रीमंत कुटुंबांकडे सुमारे ३४.२६ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. याबरोबरच प्रथम क्रमांकावर भारतीय उद्योजक मुकेश अंबानी आहेत. ब्लूमबर्गच्या यादीत २० कुटुंबांचा समावेश असून यात आणखी दोन कुटुुंबांची नावे आहेत. शापूरजी पालनजी मिस्त्री यांची संपत्ती १.६३ लाख कोटी रुपये इतकी असून ते ८ व्या स्थानी आहेत. तर सुमारे १. १२ लाखांची संपत्ती असलेले हिंदुजा कुटुंब १६ व्या स्थानी आहेत. अंबानी २०१९ मध्ये ३.७३ लाख कोटी रुपये संपत्ती होती. तेव्हाही तेथे पहिल्याच क्रमांकावर होते.
एका वृत्तानुसार, कोरोनाच्या उद्रेकातही अंबानी यांच्या संपत्तीत १.८५ लाख कोटी रुपयाची वाढ झाली आहे. साधारणपणे या २० कुटंबात वर्षभरात ७४ हजार कोटी रुपयाची वाढ झाली आहे. कोरोनामुळे रियल इस्टेट व फायनान्समध्ये आलेल्या मंदीमुळे यातील निम्म्या कुबेरांना नुकसान झाले आहे. उदा. थायलंडचे चेरावेनॉँट व हाँगकाँगच्या अब्जाधीश कुटुंबाच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत रियल इस्टेट डेव्हलपमेंट होते. कोरोनामुळे श्रीमंत-गरिबांतील अंतर आणखी वाढले आहे.
यामुळे सर्वसामान्य नागरिकांत असंतोष पसरला आहे. थायलंडमध्ये राजेशाहीला विरोध हाच मोठा पुरावा आहे. कोरोना पसरत गेल्याने असमानता वाढत गेली. सामाजिक भेदभाव आणि संधी नसल्याने त्यांच्यात निराशा आणखी वाढत गेली.
यादीत समाविष्ट प्रमुख तीन कुटुंबे आणि त्यांची संपत्ती
अंबानी कुटुंब
भारत
संपत्ति - 5.62 लाख कोटी रुपये
क्वॉक कुटुंब
हाँगकाँग
संपत्ति - 2.44 लाख कोटी रुपये
चेरावेनाँट कुटुंब
थायलंड
संपत्ति - 2.35 लाख कोटी रुपये
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.