आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजेट-2023:पहिल्या प्री-बजेट बैठकीत सुलभ जीएसटी आणि रोजगार वाढवण्यावर भर

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी अशा उपाययोजना असायला हव्यात ज्यातून रोजगारनिर्मिती होईल, असे उद्योगपतींनी सुचवले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासोबत सोमवारी झालेल्या पहिल्या प्री-अर्थसंकल्पीय बैठकीत, उपभोग वाढवण्यासाठी जीएसटी नियम सुलभ करून उत्पादने आणि सेवा त्यांच्या कक्षेत आणण्याची सूचना केली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष संजीव बजाज म्हणाले, जागतिक स्तरावर स्थिती सामान्य होण्याची शक्यता नाही. त्यामुळे विकासाचे नवे पर्याय शोधावे लागतील, रोजगार निर्मितीसाठी काम करावे लागेल. यामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेचा विस्तार होईल. बैठकीत सरकारी कंपन्यांचे खासगीकरण आणि मंदीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी गुंतवणूक आधारित धोरणावरही चर्चा झाली.

बातम्या आणखी आहेत...