आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Good News For Diwali Is That The Number Of Jobs Lost Due To Corona Is Now Increasing

रोजगार:दिवाळीत खुशखबर, कोरोनामुळे घटलेल्या नोकऱ्यांमध्ये आता होत आहे वाढ

विनोद यादव | मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात 19 उद्योगांतील रोजगारात वाढ; सोबत पीएफमध्ये योगदान देणाऱ्या कंपन्या 51% कर्मचारी 19% वाढले

कोरोना व लाॅकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात नाेकऱ्या गमवाव्या लागणाऱ्यांसाठी खुशुखबर आहे. एप्रिलमध्ये घटलेल्या नाेकऱ्यांत आता पुन्हा वाढ हाेत आहे. नाेकरी डाॅट काॅमच्या नाेकरी जाॅब स्पीक इंडेक्सनुसार रिअल इस्टेट व मालमत्ता, आैद्याेगिक उत्पादन, अवजड उद्याेग, वाहन, हाॅटेल, रेस्तराँ, एअरलाइन्स व पर्यटनसह १९ आैद्याेगिक क्षेत्रात एप्रिलच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये नियुक्त्या वाढल्या आहेत. ईपीएफआेनेही चांगले संकेत आहेत. इपीएफआेमध्ये याेगदान देणाऱ्या कंपन्यांची संख्या ५१ % म्हणजे १.७१ लाखांनी वाढून ५.०४ लाख झाली. एप्रिलमध्ये ती ३.३३ लाख हाेती. ईपीएफआे सदस्यांच्या संख्येतही १९ % वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये केवळ ३.८५ कोटी भागधारकच योगदान देत होते. ऑक्टोबरमध्ये त्यात ७४ लाख सदस्यांची वाढ झाली. नोव्हेंबरच्या प्रारंभी ईपीएफओमध्ये ४.५८ कोटी लोकांनी योगदान दिले आहे.

ऑटाे : सर्व २६,५०० आऊटलेट उघडले, नाेकऱ्यात घट नाही

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असाेसिएशनचे सीईओ सहर्ष दमानी यांनी सांगितले की, आमची कंपनी साधारणपणे ४६ लाख राेजगार उपलब्ध करून देते. ऑटाे रिटेलचा अपवाद वगळता या काळात नाेकऱ्या कमी झालेल्या नाहीत. फाडाशी निगडीत २६,५०० डिलर आऊटलेट आहेत. हे सर्व सुरू झाले.

वस्त्रोद्योग : उद्याेगांत ३५ लाख स्थलांतरित कामगार परतले

क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया चे मुख्य मेंटाॅर राहुल मेहता म्हणाले, या क्षेत्रात १.२ काेटी लाेक काम करतात. ६५ लाख स्थलांतरीत कामगारांपैकी ३५ लाख परतले. निर्यातीत सुधारणा झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये १०.४ % वाढ झाली.

बातम्या आणखी आहेत...