आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गव्हाची निर्यात:सरकार पुढच्या महिन्यात गव्हाची निर्यात मर्यादा निश्चित करू शकते

दिल्ली5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गव्हाच्या किमतीत झालेली वाढ पाहता सरकार पुढील महिन्यात त्यावर निर्यात मर्यादा घालू शकते. प्रमुख गहू उत्पादक राज्यांमध्ये सरकारी खरेदी संथ असल्याने हे पाऊल उचलणे आवश्यक झाले आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना बाजारात चांगला भाव मिळत आहे. उष्णतेमुळे पिकांचे होणारे नुकसान आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मजबूत मागणी यामुळे देशांतर्गत बाजारात गव्हाचे भाव एमएसपीच्या (२,०१५ रु. प्रतिक्विंटल) वर जात आहेत.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘जागतिक बाजारात गव्हाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी आतापर्यंत सरकारला पीक विकण्यात फारसा रस दाखवला नाही. त्यामुळे विद्यमान हंगामात सरकारी गहू खरेदीचा अंदाज आधीच घटवून १.९५ काेटी टन करण्यात आला आहे. परिस्थितीत बदल झाला नाही तर देशांतर्गत बाजारपेठेत गव्हाची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारला पावले उचलण्यास भाग पाडले जाईल.’ सरकारने खरेच तसे केले तर देशांतर्गत बाजारात गव्हाचे भाव झपाट्याने खाली येऊ लागतील, असे कृषी कमोडिटी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...