आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • The Government Will Be Informed About Air Travel, Hotel Bills, Income Tax Department's Eye On School Fees, Over spending

करबुडव्यांना वेसण:विमान प्रवास, हॉटेल बिल, स्कूल फीसवर प्राप्तिकर खात्याची नजर, जास्त खर्च केल्याची माहिती सरकारला कळणार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • नव्या टॅक्सशीटमध्ये 11 प्रकारचे व्यवहार समाविष्ट

प्रामाणिक करदात्यांसाठी सनदेच्या घोषणेसह केंद्र सरकारने करबुडव्यांवर देखरेखही वाढवली आहे. आता बिझनेस क्लासमध्ये िवमान प्रवास, परदेश प्रवास, २० हजारांवरील हॉटेल बिल, २० हजारांपेक्षा जास्त वैद्यकीय विमा प्रीमियम व एक लाखापेक्षा वार्षिक शाळा फीस भरल्याची माहिती आपोआप फॉर्म २६ एएसमध्ये जमा होईल. या फाॅर्ममध्ये प्रत्येक करदात्याच्या व्यवहारांचे विवरण असते.

नव्या तरतुदींनुसार फॉर्म २६ एएसमध्ये ११ प्रकारची नवी माहिती समाविष्ट होईल. पेमेंट मिळालेली संस्था पेमेंट करणाऱ्या व्यक्तीचा पॅन नंबर नोंदवून माहिती प्राप्तिकर खात्याकडे पाठवेल. सध्या ३० लाखांपेक्षा जास्त रकमेची मालमत्ता खरेदी, शेअर्समध्ये १० लाखांची गुंतवणूक, म्युच्युअल फंड, डीमॅट, क्रेडिट कार्ड आणि मुदत ठेवींतील १० लाखांपेक्षा मोठ्या व्यवहारांचीच माहिती जात होती.

२० हजारांपेक्षा जास्त वैद्यकीय विम्याच्या प्रीमियमच्या पेमेंटचीही होणार नोंद

 • १ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची वार्षिक शाळा फीस किंवा डाेनेशन.
 • १ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या वीज बिलाचा भरणा करणे.
 • बिझनेस क्लासमध्ये देशांतर्गत विमान प्रवास तसेच परदेश प्रवास.
 • २० हजार रुपयांंपेक्षा जास्त रकमेचे हाॅटेल बिल भरणे.
 • १ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे दागदागिने, व्हाइट गुड्स, पेंटिंग खरेदी.
 • करंट अकाउंटमध्ये ५० लाखांपेक्षा जास्त रक्कम भरणे वा काढणे.
 • नॉन करंट अकाउंटमध्ये २५ लाखांपेक्षा जास्त रक्कम भरणे वा काढणे.
 • वार्षिक २० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचा मालमत्ता कर भरणे.
 • ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचा आयुर्विमा प्रीमियम भरणे.
 • २० हजार रुपयांंपेक्षा जास्त रकमेच्या वैद्यकीय विम्याचा प्रीमियम भरणे.
 • शेअर्स खरेदी-विक्रीचे व्यवहार/डी-मॅट अकाउंट/बँक लॉकर.

व्यवहार आणि उत्पन्नाच्या दाव्यात तफावतीवर नोटीस

व्यवहारांचे रेकॉर्ड व इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये तफावत आढळली तर नोटीस बजावून कारण विचारले जाईल. उदा. एखाद्याने ५ लाखांचे उत्पन्न घोषित केले असेल आणि त्याचे व्यवहार जास्त असतील तर त्याला नोटीस बजावली जाईल.

देखरेखीची कक्षा किती रुंद, ३ उदाहरणांद्वारे समजून घ्या

1 स्कूल फीस

समजा एखाद्याची दोन मुले शाळेत शिकताहेत. दाेघांची एकूण वार्षिक फीस १ लाख रु. पेक्षा जास्त असल्यास शाळा फीस भरणाऱ्या व्यक्तीचा पॅन नंबर प्राप्तिकर विभागाला देईल.

2 इलेक्ट्रॉनिक उपकरणे

या वस्तू व्हाइट गुड्सच्या श्रेणीत येतात. एक लाख रुपयांपेक्षा महाग टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आदींची खरेदी करणाऱ्याची माहिती संबंधित दुकानदार सरकारला देईल.

3 मालमत्ता कर

दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांत २० हजार रुपये वार्षिक मालमत्ता कर सामान्य बाब आहे. येथेही स्थानिक पालिका प्रॉपर्टी टॅक्स भरणाऱ्याचा पॅन नोंदवून केंद्र सरकारला माहिती कळवेल.

वर्षभरात चार्टर निर्मिती :

गुरुवारी जारी झालेली करदात्यांची सनद (टॅक्सपेअर्स चार्टर) तयार करण्यासाठी एक वर्ष लागले आहे. अर्थ मंत्रालयाचे प्रधान आर्थिक सल्लागार संजीव सान्याल म्हणाले, चार्टरसाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, माल्टा, इंग्लंड, कॅनडासारख्या देशांच्या चार्टरचे अध्ययन करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...