आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:बॅड बँकेच्या वतीने 85 टक्के पेमेंटची हमी सरकार देणार, बँकांकडील एनपीएचा निपटारा करणे होईल सोपे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बँकांच्या थकीत कर्जाचा निपटारा सुलभ करण्यासाठी बॅड बँक नॅशनल अॅसेट रिस्ट्रक्चरिंग कंपनी लिमिटेडकडून(एनएआरसीएल) ८५ टक्के पेमेंटची हमी देईल. ही हमी एनएआरसीएलद्वारे जारी सिक्युरिटी रिसीटवर(एसआर) दिली जाईल. ही ५ वर्षांपर्यंत मान्य होईल. या हमीचा एकूण आकार ३०,६०० कोटी रु. असेल. वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, बुधवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला. २ लाख कोटींचे एनपीए निश्चित झाले आहे. पहिल्या टप्प्यात ९० हजार कोटींचे एनपीए एनएआरसीएलकडे हस्तांतरित केले जाईल.

फेस व्हॅल्यू- प्राप्ती फरक कव्हर करेल हमी
बॅड बँक एनपीएचे मूल्यांकन केल्यानंतर ती खरेदी करतात. ही सवलतीच्या किमतीत असते. समजा, १० हजार कोटींच्या एनपीएसाठी एनएआरसीएल ४००० कोटी किंमत(फेसव्हॅल्यू) निश्चित करते. त्यातून १५% रक्कम ६०० कोटी रु. एनआरसीएल रोकडमध्ये संबंधित बँकेला देईल. उर्वरित ८५% म्हणजे, ३४०० कोटी रुपये एसआर एनआरसीएल बँकेला देईल. यानंतर ३ स्थिती होतात...

1. एनपीए विकून चार हजार कोटी मिळतात
हमी वापराची गरज भासणार नाही. कारण, फेसव्हॅल्यू मिळाली आहे.

2. एनपीए विकून ४ हजार कोटींपेक्षा जास्त मिळाले
हा पैसाही बँकेकडे जाईल. गॅरंटी वापरण्याची गरज नसेल.

3. ४ हजार कोटींपेक्षा कमी, ३ हजार कोटी प्राप्त
बँकेला १ हजार कोटी रुपये सरकारच्या हमीने दिले जातील.

एनआरसीएल : न भिता एनपीए घेऊ शकेल.त्यांना फेसव्हॅल्यूच्या १५% रक्कम द्यावी लागेल. वसुली न झाल्यास ओझे एनआरसीएलवर येणार नाही.

बँकांना फायदा : बँकेला एनपीएच्या बदल्यात किमान किती रक्कम मिळेल हे त्यांना मिळेल. एनपीए कमीत विकला तरी किमान रक्कम मिळेल.

देशात ॲसेट रिस्ट्रक्चरिंग कंपन्या छोट्या रकमेच्या एनपीएवर उपाय योजत होत्या. या एआरसी मोठ्या एनपीएत हात घालायला भीत होत्या. आता मोठ्या एनपीएचा निपटारा होईल आणि बँकांचे ओझे कमी होईल. - निर्मला सीतारमण, वित्त मंत्री

बातम्या आणखी आहेत...