आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Holiday Will Start From The Day Of Mahashivratri, Know How Many Days The Bank Will Remain Closed, Bank Holiday

मार्चमध्ये बँकिंग हॉलिडे:​​​​​​​महाशिवरात्रीपासून सुरु होणार सुट्टी, जाणुन घ्या किती दिवस बँका राहणार बंद

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्च महिन्यात देशातील बँकांना दोन अशा सुट्ट्या असतील, ज्यावेळी बहुतांश भागात बँका बंद राहतील. याची सुरुवात 1 मार्चपासून होणार आहे. त्या दिवशी शिवरात्री आहे.

बहुतांश भागात बँका बंद राहतील
शिवरात्रीच्या दिवशी काही भाग वगळता बहुतांश राज्यांमध्ये बँका बंद राहतील. यासह, 18 मार्चला होळीच्या दिवशी जवळपास सर्व राज्यांमध्ये बँकांना सुटी असेल. हा भारतातील प्रमुख सण मानला जातो. काही भागात बँका या दिवशीही सुरू राहतील.

चौथ्या तिमाहीचा शेवटचा महिना
मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा आणि चौथा तिमाही आहे. त्यामुळे बहुतांश लोकांना बँकिंगचे काम करावे लागतात. नॅशनल हॉलिडे व्यतिरिक्त, काही सुट्ट्या राज्यांना देखील असतात आणि या दिवशी त्या राज्यातील बँका बंद असतात. याशिवाय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी देशभरातील बँका बंद राहतील. सिक्कीममध्ये 3 मार्च रोजी स्थानिक सणांमुळे बँका बंद राहतील. तर 4 मार्च रोजी मिझोराममध्ये बँकिंग सुट्टी असेल.

17 मार्च रोजी होलिका दहन
त्याचप्रमाणे 17 मार्च रोजी होलिका दहननिमित्त उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील बँका बंद राहणार आहेत. 18 मार्च रोजी होळी असल्याने संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल. मात्र, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोलकाता, तिरुवनंतपुरम आणि कोची येथे बँका सुरु राहतील.

मणिपूर आणि बिहारमध्ये 19 मार्च रोजी सुट्टी
ओडिशा, मणिपूर आणि बिहारमध्ये 19 मार्च रोजी बँका बंद राहतील. अशा प्रकारे अनेक राज्यांमध्ये तीन दिवस बँकांना सुट्ट्या असतील. त्यानंतर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असेल. 27 मार्चसह देशभरातील बँका 6 मार्च, 12 मार्च, 13 मार्च, 20 मार्च आणि 26 मार्च रोजी शनिवार आणि रविवारी बंद राहतील.

3 प्रकारच्या सुट्ट्या आहेत
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 3 प्रकारच्या बँक सुट्ट्या जारी करते. यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक क्लोजिंग ऑफ अकाउंट्स यांचा समावेश आहे. बिहार दिनानिमित्त 22 मार्च रोजी बिहारमध्ये बँका बंद राहतील. तसे, मार्चमध्ये एकूण 13 दिवस बँका बंद राहतील. तथापि, राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रसंगी ते बंद राहील. म्हणजेच या सुट्ट्या देशभरात एकाच वेळी नसतात.

पूर्ण लिस्ट पाहण्यासाठी https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या लिंकवर जाऊ शकता

बातम्या आणखी आहेत...