आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • The Industry Is Back On Track, But The Pace Of Recovery Is Slow; 68 Per Cent Of Companies Said Declining Demand Was The Biggest Problem

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वेक्षण:उद्योग रुळावर परततोय, मात्र सुधारणेची गती मंद; 68 टक्के कंपन्यांनी सांगितले- घटलेली मागणी सर्वात मोठी अडचण

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोठ्या कंपन्यांनी सांगितले- जूनच्या तुलनेत ऑगस्टमध्ये स्थिती सामान्य होण्याची वेळ, लहान व्यावसायिक आशावादी
  • व्यापारात वाढ होण्याची 73% हून जास्त लहान, मध्यम व्यावसायिकांना अपेक्षा

अनलॉकनंतर उद्योग जगत रुळावर परतत आहे. मात्र, त्यासाठीचा वेग मंद आहे. कमकुवत मागणीमुळे सर्वात जास्त आव्हान चिंतेचा विषय आहे. अर्थव्यवस्थेत मागणी वाढण्यासाठी प्रोत्साहन पॅकेजची आवश्यकता असल्याचे यातून ध्वनित होते. फिक्की व ध्रुव अॅडव्हायझरी सर्व्हिसने उद्योगांत आपल्या ऑगस्ट महिन्यात केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर ही बाब सांगितली. जून व ऑगस्ट महिन्याच्या सर्वेेक्षणाच्या तुलनेत हे वास्तव समोर आले की, उद्योग रुळावर येत आहे, मात्र त्याचा वेग मंद आहे. मागणीत घट हे आव्हान असल्याचे ६८% कंपन्यांनी मान्य केले आहे.

फिक्कीचे सर्वेक्षण : मागणी वाढवण्यासाठी पॅकेजची आवश्यकता

ऑर्डर बुक

जून : २५ %कंपन्यांनी सांगितले की, ऑर्डरच्या बुकिंगमध्ये सुधारणा.

ऑगस्ट : ४४ % म्हणाले,ऑर्डर बुकमध्ये सुधारणा झाली.

पुरवठा साखळी

जून : २९ टक्के कंपन्यांनी सांगितले की, पुरवठा साखळीत सुधारणा झाली. ऑगस्ट : ५८% कंपन्यांनी सांगितले की, पुरवठा साखळी सुधारली आहे.

कॅश फ्लाे

जून : २१ % कंपन्यांनी सांगितले की, अनलॉकचा सकारात्मक परिणाम आहे. ऑगस्ट : ५१ %कंपन्यांनी कॅश-फ्लोमध्ये सुधारणा झाल्याचे मान्य केले.

अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्यासाठी प्रयत्नांची सतत आवश्यकता आहे. वित्तीय मदतीच्या अनुपस्थितीत आपण कमी उत्पन्न,मागणीच्या चक्रव्यूहात अडकले जाऊ. आता सामूहिक निर्णयाची गरज.-डॉ. संगीता रेड्डी, अध्यक्षा, फिक्की

व्यापारात वाढ होण्याची ७३% हून जास्त लहान, मध्यम व्यावसायिकांना अपेक्षा

आर्थिक हालचालींतील सुधारणांमध्ये “एचपी आशिया एसएमबी अहवाल-२०२०’नेही आशा जागवली आहे. अहवालानुसार, भारतातील ७३ टक्क्यांहून जास्त लहान व मध्यम आकाराच्या व्यावसायिक संस्थांना आपले अस्तित्व टिकेल आणि कोरोना संकटानंतर व्यापारात पुन्हा उसळी येईल,अशी आशा वाटते.

संशोधन अहवालानुसार, “बाउन्स बॅक’बाबत भारतीय व्यावसायिक आशियाच्या आपल्या अन्य समपदस्थ व्यावसायिकांपेक्षा जास्त निश्चिंत आहेत. आशियाभरातील लहान आणि मध्यम उद्योग संस्थांनी मिळून हे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये भारत, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम आणि ऑस्ट्रेलियातील बाजारांत मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला.

व्यावसायिकांनी या चार गोष्टी महत्त्वाच्या मानल्या

भारतीय एसएमबी युनिट्सने ऑनलाइन टूल्सचा जास्तीत जास्त वापर, व्यावसायिक रणनीती, कामात नवीन प्रयोग आणि लवचिकपणा सर्वात महत्त्वाचा मानला आहे. संशोधनात वृद्धी आणि डिजिटलायझेशनमधील सहसंबंध प्रामुख्याने समोर आले. म्हणजे, कोणती कंपनी जेवढी जास्त डिजिटल असेल तेवढी वाढ तेज होईल.