आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशातील कोरोना विषाणूची महारोगराई थोपवण्यासाठी २५ मार्चपासून २१ दिवसांसाठी सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे ७-८ लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. विश्लेषक आणि उद्योग संघटनांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. या देशव्यापी बंदमध्ये बहुतांश कारखाने आणि व्यवसाय ठप्प आहेत. उड्डाणे रद्द आहेत, रेल्वेसेवाही बंद आहे. वाहन आणि लोकांच्या प्रवासावरही निर्बंध आले आहेत. यामुळे ७०% आर्थिक उत्पादन, गुंतवणूक, निर्यात आणि अत्यावश्यक वस्तू वगळता अन्य उत्पादनांची विक्री ठप्प आहे. केवळ कृषी, खाण, अत्यावश्यक सेवा, काही वित्तीय आणि आयटी सेवा व लोकसेवांनाच कामास परवानगी मिळाली आहे. सेंट्रल इन्स्टिट्युशनल रिसर्चने सांगितले की, संकटामुळे देश पुन्हा २०२०-२१ मध्ये एक अंक वृद्धी नोंदवण्याच्या मार्गावर पोहोचला आहे. देशव्यापी टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेला ७-८ लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. या महिन्याच्या सुरुवातीस अॅक्यूट रेटिंग्ज अँड रिसर्च लि.ने अंदाज व्यक्त केला होता की, टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेला रोज ४६४ कोटी डॉलर(३५,००० कोटी रु.)चे नुकसान होत आहे.
रिटेलचे सर्वात जास्त नुकसान
छोट्या दुकानदारांची देशव्यापी संघटना कॅटनुसार देशव्यापी बंदमुळे रिटेलमध्ये २.२८ लाख कोटीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. रिटेल सेक्टरमध्ये ७ कोटी लहान, मध्यम , मोठे दुकानदार आहेत.
रिअल इस्टेट क्षेत्राचे १ लाख कोटीचे नुकसान
रिअल इस्टेट क्षेत्राची स्वयं नियामक शाखा नारेेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांच्यानुसार, रिअल इस्टेट क्षेत्रात टाळेबंदीमुळे १ लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.