आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Market Boom Will Not Stop After Touching The Psychological Level Of 50 Thousand; Sensex 1 Lakh By 2025: Expert

तेजी सुरूच राहील:50 हजारांची मनोवैज्ञानिक पातळी स्पर्श केल्यानंतर बाजाराची तेजी थांबणार नाही; 2025 पर्यंत सेन्सेक्स 1 लाख : तज्ज्ञ

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धीरूभाई अंबानींनी सामान्यांसाठी खुले केले शेअर बाजाराचे दरवाजे

देशातील सर्वात जुना संवेदी निर्देशांक सेन्सेक्सने अखेर ५० हजारांच्या मनोवैज्ञानिक पातळीला स्पर्श केला. यामध्ये अखेरचा ५००० अंक सेन्सेक्स गेल्या ३२ सत्रांदरम्यान वाढला आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, बाजाराची तेजी सध्या जारी राहील आणि पुढील पाच वर्षांत सेन्सेक्स एक लाखाची पातळी पार करेल. मात्र, शॉर्ट टर्ममध्ये सर्वांचे लक्ष सर्वसाधारण बजेटवर आहे. कारण, अर्थसंकल्प बाजाराची दिशा निश्चित करेल, असे मानले जात आहे. येस सिक्युरिटीजचे वरिष्ठ अध्यक्ष आणि इन्स्टिट्यूशनल रिसर्च हेड अमर अंबानी म्हणाले, आर्थिक हालचालींमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त तेजी, बाजारात एफपीआयचा फ्लो आणि वित्तमंत्र्यांकडून मिळालेल्या “अभूतपूर्व बजेट’च्या आश्वासनामुळे उत्साहित सेन्सेक्सने ५०,००० चा आकडा स्पर्श केला. आपण भारतीयांनी इक्विटीसाठी सुपर-सायकलमध्ये प्रवेश केला आहे. उदा. २००३ याचे उदाहरण होते. अमेरिकी डॉलर कमकुवत होणे, सरकारकडून निर्णायक सुधारणा, उत्पन्नात वेगवान वृद्धी आणि तरलता प्रवाह पाहता मला अपेक्षा आहे की, २०२५ पर्यंत सेन्सेक्स १,००,००० च्या आकड्यापर्यंत पोहोचेल. आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे एमडी व सीईओ विनायक चंडोक म्हणाले, बळकट कॅपिटल इनफ्लो, व्याजदरांत घट आणि कंपन्यांच्या चांगल्या ताळेबंदात सरकारकडून वृद्धी रुळावर आणण्याच्या प्रयत्नांतून अर्थव्यवस्थेत तेजीची आशा आहे.

सेन्सेक्स ५०,००० पार होण्याचे महत्त्व

अर्थव्यवस्थेसाठी

> मोठ्या स्तरावर पाहिल्यास भारतात लिस्टेड सर्व कंपन्यांचे मूल्य वेगाने वाढत आहे.

> जगभरातील गुंतवणूकदारांना वाटते की, भारत आर्थिकदृष्ट्या बळकट होत आहे.

> विदेशी गुंतवणूक वाढेल, भांडवल टंचाई दूर होईल आणि कंपन्या विस्तार करतील.

सर्वसामान्यांसाठी

> कंपन्यांच्या विस्तारासाठी सुलभ भांडवल उपलब्ध होईल आणि रोजगार वाढेल.

> शेअर्समध्ये पैसा गुंतवणाऱ्यांचे उत्पन्न वाढेल, ते खर्च वाढवतील, फायदा होईल.

> अर्थव्यवस्थेत पैसा आल्यावर एक भाग सामान्यांपर्यंत पोहोचेल.

धीरूभाई अंबानींनी सामान्यांसाठी खुले केले शेअर बाजाराचे दरवाजे

शेअर बाजाराशी सामान्य माणसाला जोडण्याचे श्रेय सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांना जाते. १९७७ मध्ये अंबानींनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या आयपीओतून ५८ हजार मध्यमवर्गीय कुटुंबांना १० रु. मूल्याचे २८ लाख इक्विटी शेअर विकले होते. त्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक केवळ संस्थात्मक किंवा श्रीमंत लोक करत होते. अंबानींचे हे पाऊल धाडसी ठरवण्यात आले होते आणि त्यात अपयश येईल, अशी शक्यता व्यक्त केली होती. मात्र, त्यांना केवळ मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना आपल्या कंपनीशी जोडण्यात यश आले नाही तर मोठा नफाही कमावून दिला. रिलायन्सच्या यशानंतर अन्य मोठ्या कंपन्यांनीही रिटेल गुंतवणूकदारांना शेअर विकणे सुरू केले.

५० हजार टप्पा, लाखाकडे पाहावे लागेल, उद्याचे ब्ल्यूचिप खरेदी करावे लागतील

देशातील सर्वात जुना इक्विटी इंडेक्स सेन्सेक्सने ५० हजारांचा मनोवैज्ञानिक आकडा पार केला. यादरम्यान सेन्सेक्सने आपल्या ५० हजारांच्या प्रवासात अनेक चढ-उतार पाहिले. १०० च्या बेंचमार्कने जुलै १९९० मध्ये १००० अंकांच्या चढाईत बीएसई सेन्सेक्सला जवळपास १० वर्षे लागली. मे २०१९ मध्ये सेन्सेक्सने ४०,००० चा आकडा पार केला आणि आता ५०,००० च्या आकड्याला स्पर्श केला आहे. कोरोना महारोगराई आणि त्याआधी जागतिक मंदीत २०२० च्या पहिल्या तिमाहीत जाेरदार घसरणीसह २६,००० अंकांखाली जाणाऱ्या सेन्सेक्सच्या या तेजीला आणि उंचीला बरेच महत्त्व आहे. दुसरीकडे, गुंतवणूकदार आणि विश्लेषकांसाठी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. शेअर बाजाराला आपला वेग आणि डोके आहे. यामुळे कधीही अनपेक्षित गोष्टीची आशा व्यक्त केली जाऊ शकते. ऑक्टोबर २०१३ मध्ये २१,००० चा आकडा पार केला तेव्हा काहींनी २०२० मध्ये हा १ लाख पार होण्याची भविष्यवाणी केली होती.

लक्षात ठेवण्यासारखा धडा : शेअर कितीही चांगला असू द्या, खरेदीनंतर विसरू नका

गुंतवणूकदारांनी १९७९ मध्ये काही ब्लूचिप शेअर उदा. जेके सिंथेटिक्स, मेटल बॉक्स, हिंदुस्तान मोटर्स, सिंधिया स्टीमशिप, जेनिथ स्टील आदी खरेदी करून ठेवले असतील तर ते त्यांच्यासाठी बेकार आहेत. त्यामुळे आपल्या शेअरची कामगिरी सतत पाहिली पाहिजे.

टिप्सवर अवलंबून राहू नका

बाजारात “मोफत जेवणा’सारखी कोणती वस्तू नसते. तुम्ही टिप्सवर अवलंबून असाल तर खूप भाग्यवान होण्याची गरज नाही. या टिप्स नेहमी शक्य नसतात. पैसा-संपत्ती जमा करायची असेल तर थोड्या कठोर कष्टासाठी तयार राहा. स्वत:हून शेअरचा अभ्यास करा.

बातम्या आणखी आहेत...