आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Market Value Of American Banks Is Rs 18 Lakh Crore. Slipped; Loss Due To Decline In Price Of Securities

फायनान्स:अमेरिकन बँकांचे बाजारमूल्य 18  लाख कोटी रु. घसरले; रोख्यांच्या किमतीत घट झाल्यामुळे तोटा

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२००७-०९ च्या जागतिक आर्थिक संकटाने बँकांमधील त्रुटी दूर केल्या असतील, असे अलीकडेपर्यंत लोकांना वाटले असेल, पण तसे नाही. बँका अजूनही बाजारात दहशत पसरवू शकतात. ९ मार्च रोजी सिलिकॉन व्हॅली बँकेतून (एसव्हीबी) एकाच दिवसात ३.४६ लाख कोटी रुपये काढण्यात आले. एसव्हीबी ही एका आठवड्यात कोसळलेल्या अमेरिकेतील तीन बँकांपैकी एक आहे. गुंतवणूकदार घाबरले आहेत. या महिन्यात आतापर्यंत अमेरिकन बँकांचे बाजारमूल्य १८ लाख कोटी रुपयांनी घटले आहे. ही १७% ची घसरण आहे. युरोप, जपानमध्येही बँकांचे समभाग घसरले आहेत. क्रेडिट सुईस बँकेचे समभाग २४% खाली आले आहेत. त्यामुळे आर्थिक संकटानंतर १४ वर्षांनी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे बँका किती कमकुवत आहेत? एसव्हीबीचे वेगाने झालेले पतन सिस्टिममधील जोखमींवर प्रकाश टाकते. व्याजदर कमी व मालमत्तेचे मूल्य जास्त असताना बँकेने दीर्घकालीन बाँडची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. त्यानंतर फेडरल रिझर्व्हने चाळीस वर्षांत सर्वाधिक व्याजदर वाढवले ​​आणि बाँडच्या किमती घसरल्याने बँकेचे मोठे नुकसान झाले. २००७-०९ चे आर्थिक संकट अंदाधुंद कर्ज आणि गृहनिर्माण बाजारपेठ कोसळल्याचा परिणाम होता. संकटानंतर बँकांच्या कर्जावर मर्यादा घालण्यासाठी नियम लागू करण्यात आले. मालमत्ता विक्रीसाठी ठेवण्यावर भर देण्यात आला. सरकारी रोखे खरेदी करण्यासाठी बँकांना प्रोत्साहन देण्यात आले. अनेक वर्षांपासून महागाई आणि व्याजदर कमी असल्याने दीर्घकालीन रोख्यांचे मूल्य कमी झाल्यास बँकांना किती तोटा सहन करावा लागेल याचा विचार फार कमी जणांनी केला असेल. महामारीच्या काळात बँका कमकुवत होण्याची परिस्थिती अधिक निर्माण झाली. बँकांमध्ये जमा झालेल्या पैशांचा महापूर आला आणि सरकारने दिलेल्या रोख मदतीमुळे बराच पैसा व्यवस्थेत आला. अनेक बँकांनी ठेवीतील पैसे दीर्घ मुदतीचे रोखे आणि सरकारी हमी सिक्युरिटीज खरेदी करण्यासाठी वापरले आहेत. समस्या अशी आहे की, बँकेने इतर लोकांच्या पैशाने, विशेषतः ठेवींनी बाँड खरेदी केले. मुदतपूर्ती होईपर्यंत बाँड ठेवण्यासाठी समान रक्कम जमा करावी लागेल. व्याजदर वाढले की बँक ठेवींसाठी स्पर्धा वाढते. ग्राहक जेपी मॉर्गन चेस किंवा बँक ऑफ अमेरिका यांसारख्या मोठ्या बँकांना चिकटून राहतात. दर वाढले की त्यांचे उत्पन्न वाढते. त्या तुलनेत सुमारे ४७०० छोट्या आणि मध्यम बँकांना ठेवीदारांना पैसे काढण्यापासून रोखण्यासाठी त्यांना जास्त व्याज द्यावे लागते. त्यांचा नफा कमी होतो. यावरून काही बँक शेअर्सच्या किमती का कमी झाल्या हे स्पष्ट होऊ शकते. दुसरी समस्या सर्व बँकांवर परिणाम करते. विश्वासू ठेवीदार संकटाच्या वेळी जाऊ शकतात. बँकेला मालमत्ता विकून याची भरपाई करावी लागते. अचानक त्यांचे मोठे भांडवल कमी होते. ही चिंताजनक शक्यता लक्षात घेऊन अमेरिकेच्या फेड रिझर्व्हने गेल्या आठवड्यात वेगाने कृती केली. ते रोख्यांच्या दर्शनी मूल्यावर कर्ज देत आहेत. काही दीर्घकालीन रोख्यांवर ते बाजारमूल्यापेक्षा ५०% जास्त असू शकते. या मदतीमुळे अनपेक्षित नुकसानीने बँक बाँड्स बुडणे अशक्य आहे. पण, त्याची किंमतही चुकवावी लागू शकते. संकटात फेड रिझर्व्हकडून मदत मिळण्याच्या अपेक्षेने बँका बेपर्वाईने वागू शकतात. जास्त परताव्याच्या आशेने बँका अधिक जोखीम पत्करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...