आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) आणि HDFC बँक यांनी विलीनीकरणाची घोषणा केली आहे. या डील अंतर्गत HDFC बँकेत HDFC चा 41% स्टेक असेल. HDFC ने आज, म्हणजेच सोमवारी सांगितले की, र्डाच्या बैठकीत HDFC चे HDFC बँकेत विलीनीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या विलीनीकरणात कंपनीचे शेअरहोल्डर्स आणि क्रेडिटर्स (कर्जदार) यांचाही सहभाग असेल.
HDFC सांगितले की, प्रस्तावित कराराचा उद्देश एचडीएफसी बँकेच्या गृह कर्ज पोर्टफोलिओमध्ये सुधारणा करणे आणि विद्यमान ग्राहकांचा विस्तार करणे आहे. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे हे विलीनीकरण आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीपर्यंत पूर्ण होईल.
एचडीएफसी लिमिटेडचे चेअरमन दीपक पारेख म्हणाले की, हे समान विलीनीकरण आहे. आम्हाला विश्वास आहे की RERA च्या अंमलबजावणीमुळे, गृहनिर्माण क्षेत्राला पायाभूत सुविधांचा दर्जा, परवडणाऱ्या घरांसाठी सरकारी पुढाकार, यासह इतर गोष्टींमुळे गृहनिर्माण वित्त व्यवसायाला मोठी चालना मिळेल.
दीपक पारेख पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत बँका आणि NBFCच्या अनेक नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विलिनीकरणाची शक्यता निर्माण झाली. यामुळे मोठ्या ताळेबंदाला मोठ्या पायाभूत सुविधा कर्जाची व्यवस्था करण्याची संधी मिळाली. त्याच वेळी, अर्थव्यवस्थेची पत वाढ वाढली. परवडणाऱ्या घरांना चालना मिळाली आणि कृषीसह सर्व प्राधान्य क्षेत्रांना पूर्वीपेक्षा जास्त कर्ज दिले गेले.
HDFC ची संपत्ती 6.23 लाख कोटी आणि HDFC बँकेची 19.38 लाख कोटी आहे
31 डिसेंबर 2021 पर्यंत HDFC ची एकूण संपत्ती 6.23 लाख कोटी रुपये आणि उलाढाल 35,681.74 रुपये आहे. दुसरीकडे, HDFC बँकेची एकूण मालमत्ता 19.38 लाख कोटी रुपये आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.