आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The New ‘kings’ Of The Retail Investor Stock Market; Half Of The Market's Trading Volume Is Their; News And Live Updates

खास ट्रेंड:किरकोळ गुंतवणूकदार शेअर बाजाराचे नवे ‘राजे’; मार्केटचा निम्मा ट्रेडिंग व्हॉल्यूम त्यांचाच

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाच वर्षांत इक्विटी ट्रेडिंगमध्ये रिटेल गुंतवणूकदारांची हिस्सेदारी 5 वर्षांत 33 टक्के वाढून 45टक्केनवी दिल्ली

देशातील शेअर बाजार म्युच्युअल फंड, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार किंवा विमा कंपन्यांसारख्या संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या विश्वासावर नव्हे, तर किरकोळ गुंतवणूकदारांच्या जोरावर बळकटी दाखवत आहे. सध्या जवळपास निम्मी ट्रेडिंग वैयक्तिक वा किरकोळ गुंतवणूदकार करत आहेत. पाच वर्षांपूर्वी त्यांचा वाटा एक तृतीयांश होता. देशातील सर्वात मोठ्या शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये भांडवली बाजारात किरकोळ गुंतवणूकदारांची हिस्सेदारी वाढून ४५% वर पोहोचली. २०१६ मध्ये हा ३३% होता. हे आकडे उलाढालीच्या हिशेबाने आहे. याचा अर्थ एनएसईचा सरासरी रोजचा कारभार ६०,००० कोटी रु. असल्यास त्याची निम्मी ट्रेडिंग किरकोळ गुंतवणूकदार करत आहेत. त्यामुळे बाजारातील तेजी वा घसरणीसाठी किरकोळ गुंतवणूकदार जबाबदार आहेत.

बाजारात स्थैर्य वाढले
इक्विटीच्या ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये किरकोळ गुंतवणूकदारांची भागीदारी वाढल्याने देशातील शेअर बाजारात स्थैर्य वाढले आहे. विक्रीसाठी बाजार वरचढ होणे सोपे राहिले नाही. - एस. रंगनाथन, रिसर्च हेड, एलकेपी सिक्युरिटीज

रिटेल इन्व्हेस्टर यामुळे वाढले
पर्यटन, हॉटेल, रेस्तराँ आणि मल्टिप्लेक्स बंद आहेत. अशा स्थितीत ज्यांच्याकडे पैसे आहेत ते शेअर बाजारात गुंतवत आहेत. यामुळे वेळही जातो आणि कमाईही होत आहे.

इंडेक्स ऑप्शन्स मार्केटमध्ये हिस्सेदारी वाढली
सौद्यांच्या संख्येच्या हिशेबाने एनएसई जगातील सर्वात मोठा इंडेक्स अॉप्शन्स मार्केट आहे. येथेही किरकोळ गुंतवणूकदारांची भागीदारी वाढली आहे. या श्रेणीत गुंतवणूकदारांची हिस्सेदारी २०२०-२१ मध्ये वाढून ३० टक्के झाली. २०१५-१६ मध्ये २२ टक्के होती. यादरम्यान या बाजारात प्रॉप ट्रेडर्सची हिस्सेदारी सर्वात जास्त ४० टक्के राहिली. पाच वर्षांपूर्वी ही ५० टक्के होती. या श्रेणीत सर्वात कमी १६ टक्के हिस्सेदारी एफआयआयची राहिली. येथे लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे, विजय केडिया आणि राकेश झुनझुनवाला यांच्यासारखे मोठे गुंतवणूकदारही आपल्या नावाने ट्रेडिंग करतात. त्यांची गुंतवणूक अनेक म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीपेक्षाही जास्त आहे. मात्र, भारतात अशा गुंतवणूकदारांची ताकद जास्त नाही. त्यामुळे आकड्याच्या हिशेबाने देशात नवा ट्रेंड दाखवतात.

इंडेक्स फ्यूचर्समध्येही हुकूमत
देशाच्या इंडेक्स फ्यूचर्स (प्रामुख्याने निफ्टी आणि बँक निफ्टी) डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये मोठी हिस्सेदारी ठेवतात. येथेही ट्रेडिंगमध्ये रिटेल गुंतवणूकदारांची हिस्सेदारी ३९% आहे. एफआयआयची १५% आणि देशातील म्युच्युअल फंड्सची केवळ १ टक्का आहे. या बाजारात जवळपास २९% हिस्सेदारी प्रॉप ट्रेडिंगची आहे. जी काही वर्षांपूर्वीपासून या पातळीवर आहे.
एनएसईवर ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये वेगवेगळ्या श्रेणीची हिस्सेदारी

बातम्या आणखी आहेत...