आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहीत आहे का ?:सर्वात ज्येष्ठ अब्जधीशाचा पद्मभूषण घेण्यास नकार

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिंद्रा अँड महिंद्राचे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा नुकतेच ९९व्या वर्षी सर्वात ज्येष्ठ अब्जधीश (१.१ अब्ज डॉलर म्हजणेच ९ हजार कोटी रुपयाची संपत्ती) म्हणून फोर्ब्सच्या यादीत सामील झाले. अनेक कंपन्यांच्या मंडळावर राहिलेेले महिंद्रा १९८४ मध्ये भोपाळ गॅस दुर्घटनेसाठी जबाबदार युनियन कार्बाइडचे नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन होते. २००२ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांचे नाव पद्मभूषणासाठी प्रस्तावित केलेे. मात्र महिंद्राने गॅस दुर्घटनेप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यामुळे आणि सीबीआयच्या सुरू असलेल्या तपासामुळे पुरस्कार देऊ नये, अशी विनंती केली होती.