आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Owner Of The Company Has Changed Four Times In Seventy Years, The Secret Of The Recipe Is Still Locked

​​​​​​​केएफसी ब्रँडच्या यशाची कहाणी:सत्तर वर्षांत चार वेळा बदलले कंपनीचे मालक, रेसिपीचे रहस्य अद्याप कुलूपबंद

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केएफसी | फास्ट फूड चेन {स्थापना-१९५२ {विक्री (२०२१)-२.५ लाख कोटी रु.

अमेरिकन लेखक स्टीफन किंग यांचे एक वाक्य आहे, ‘उत्पादन कारखान्यात जन्माला येते, परंतु त्याला ग्राहक ब्रँड बनवतात.’ केएफसी हा असाच एक जागतिक ब्रँड आहे. मॅकडोनाल्डनंतर ही जगातील दुसरी सर्वात मोठी रेस्टॉरंट चेन आहे. केस स्टडी म्हणून तळलेले आणि न तळलेले चिकन पदार्थ विकणाऱ्या केएफसी व त्याच्या संस्थापकाची कथा बिझनेस स्कूलमधील विद्यार्थ्यांना शिकवली जाते. फोर्ब्जच्या जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड्सच्या यादीत ९६ व्या क्रमांकावरील केएफसीची मालकी स्थापनेपासून चार लोक आणि कंपन्यांच्या हाती गेली. पण सातत्यपूर्ण चवीने ते ग्राहकांच्या पसंतीस उतरले. या वेळी जाणून घ्या ब्रँड स्टोरीमध्ये केएफसीची कहाणी...

लोक याच्या संस्थापकाचे उदाहरण देतात केएफसीची ओळख ‘कर्नल सँडर्स’ आहे. १८९० मध्ये अमेरिकेच्या इंडियानात जन्मलेल्या सँडर्स यांचे बालपण वंचिततेत गेले. वयाच्या ७ व्या वर्षापासून ते स्वयंपाक करायला शिकले. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी विविध प्रकारची कामे केली. त्यानंतर वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी केंटकी प्रांतातील गॅस स्टेशनवर खुर्ची-टेबल ठेवून चिकन विकायला सुरुवात केली. लोकांना चव आवडली तर त्याचे रूपांतर रेस्टॉरंटमध्ये केले. १९३९ मध्ये सँडर्स यांनी शेवटी चव व सातत्य राखण्यासाठी चिकन तळण्याचा योग्य मार्ग शोधला. त्यांनी ११ औषधी वनस्पती व मसाल्यांचे मिश्रण तयार केले आणि चिकन तळण्याची गुप्त कृती तयार झाली. त्यांचा मित्र पीटर हर्मनने या चिकनचे नाव ‘केंटकी फ्राइड चिकन’ ठेवले आणि तेव्हापासून त्याचे नाव आहे - केएफसी. व्यवसाय वाढवण्यासाठी सँडर्स रस्त्यावर चिकन विकायचे. त्यांना १००९ वेळा ‘नाही’ ऐकावे लागले. फ्रँचायझीसाठी पहिल्यांदा १९५२ मध्ये होकार मिळाला. सँडर्स १९८० मध्ये मरण पावले.

२६,९३४ स्टोअर्स आहेत जगभरात २५० स्टोअर्स भारतातील विविध शहरांत ९९% फ्रँचायझी मॉडेलने काम करतातं २७% सर्वाधिक विक्री चीनमध्ये होते १९९५ मध्ये भारतात पहिले रेस्टाॅरंट १९९७ पासून यम ब्रँड्सकडे मालकी

एकेकाळी तंबाखू विक्रेत्यांच्या हाती होती सूत्रे केएफसी स्थापनेपासून चार लोकांच्या हाती गेली आहे. प्रत्येक वेळी त्याचे मूल्य वाढत गेले. संस्थापक कर्नल सँडर्स यांनी प्रथम १९६४ मध्ये जॉन ब्राउन आणि जॅकी मेस्सी या दोन लोकांना २ दशलक्ष डॉलर्समध्ये कंपनी विकली. यामध्ये त्यांनी अट घातली की, त्यांना आजीवन पगार दिला जाईल, तसेच केएफसीचा दर्जा नियंत्रित केला जाईल आणि ट्रेडमार्क त्यांच्या नावावर राहील. १९७० पर्यंत त्याची ३,००० आउटलेट्स होती. १९७१ मध्ये ब्राउनने कंपनी ह्युब्लिन या खाद्य आणि पेय कंपनीला विकली. १९८२ मध्ये आर.जे. रेनॉल्ड्स नावाच्या तंबाखू कंपनीने ह्युब्लिन विकत घेतली. त्यानंतर १९८६ मध्ये रेनॉल्ड्सने ती पेप्सिकोला ८५० दशलक्ष डाॅलरला विकली. १९९७ मध्ये पेप्सिकोने रेस्टॉरंट व्यवसायात प्रवेश करण्यासाठी यम ही कंपनी स्थापन केली आणि यम ब्रँड्स ही केएफसीची मूळ कंपनी झाली!

भारतात देवयानी समूहाकडे मालकी हक्क केएफसी ही खरं तर दुसरी कंपनी ‘यम! ब्रँड’चा एक भाग आहे. यम! ब्रँड्स केएफसीव्यतिरिक्त टॅको बॅल, पिझ्झा हट आणि द हॅबिट बर्गरसारख्या रेस्टॉरंट चेनही चालवते. त्याच्या मालकीचे रेस्टॉरंट उघडण्यासाठी मोठी गुंतवणूक आणि संचालन खर्चाचा समावेश होतो, त्यामुळे केएफसी फ्रँचायझीचे लोकप्रिय मॉडेलवर काम करते. म्हणजेच परवान्याद्वारे ते आपला लोगो, नाव, कामाची पद्धत आणि उत्पादने विकण्याची परवानगी देतात. त्या बदल्यात फ्रँचायझीकडून पैसे घेतात. केएफसीकडे फक्त ७० रेस्टॉरंट इमारती आहेत. यापैकी ८५% अमेरिकेबाहेर आहेत. भारतात केएफसी आणि पिझ्झा हट या देवयानी इंटरनॅशनल लिमिटेडच्या मालकीच्या आहेत. हे केएफसीचे भारतातील सर्वात मोठे फ्रँचायझी भागीदारही आहे.

मार्केटिंग... ख्रिसमसला केएफसी डे, खूप आधी आगाऊ बुकिंग जपानमध्ये ख्रिसमसला केएफसीच्या बकेट खरेदी करतात. यासाठी दरवर्षी काही आठवडे आधी बुकिंग होते. या यशामागे जबरदस्त मार्केटिंग आहे. केंटकी फॉर ख्रिसमस (केएफसी) मोहीम १९७४ पासून सुरू आहे.

गुप्तता... ११ वनस्पती-मसाले सीईओंनाही माहीत नाही सँडर्स यांनी ११ मसाले-औषधींच्या पाककृती हाताने लिहिल्या. आजही ही गुप्त पाककृती केएफसीच्या मुख्यालयात कुलूपबंद आहे. ती इतके सुरक्षित आहे की त्यांच्या सीईओलाही ते कळू शकत नाही.

रणनीती... फ्रँचायझी मॉडेलने खर्च कमी, कमाई अधिक केएफसी फ्रँचायझी फीव्यतिरिक्त त्याच्या उत्पादनांमधून पैसे कमावते. केएफसी चिकन पॉट पाय हे सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन आहे. हे त्याचे सर्वात महागडे उत्पादनदेखील आहे.

मनोरंजक... सँडर्स मानद कर्नल होते, लष्करी पदवी नव्हती सँडर्स त्यांच्या रेसिपीसाठी इतके प्रसिद्ध होते की, १९५० मध्ये केंटकीच्या गव्हर्नरने त्यांना ‘कर्नल’ ही पदवी बहाल केली आणि त्यानंतर ते कर्नल सँडर्स झाले. मग ते पांढरे कपडे, टाय घालू लागले.

बातम्या आणखी आहेत...