आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Pace Picked Up By The Service Sector; The PMI Jumped To 53.6, The Region's Best Performance So Far In 2022| Marathi News

सर्वात चांगली कामगिरी:सेवा क्षेत्राने पकडला वेग; पीएमआय गेला 53.6 वर, 2022 वर्षातील या क्षेत्राची आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेवा क्षेत्रात जोरदार सुधारणा हाेत आहे. काेविड महामारीचा सर्वात जास्त परिणाम झालेल्या क्षेत्रांमध्ये समावेश असलेल्या सेवा क्षेत्राचा पीएमआय गेल्या महिन्यात ५३ पेक्षा जास्त वर गेला आहे. २०२२ वर्षातील या क्षेत्राची आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी आहे. परंतु महागाईच्या वेगामुळे याला ब्रेक लागू शकताे.

एस अँड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पर्चेसिंग इंडेक्स मार्चमध्ये ५३.६ वर गेला, जो फेब्रुवारीमध्ये ५१.८ हाेता. सलग आठव्या महिन्यात सेवा पीएमआय ५०च्या वर राहिला असून याचा अर्थ वृद्धी असा आहे. आता या वाढीने वेग घेतला आहे, परंतु गेल्या महिन्यात उत्पादन खर्चात गेल्या ११ वर्षांत झालेली वाढ आव्हान ठरेल.

निर्बंधांनंतर ग्राहकांची खर्च करण्याची तयारी
पॉलिना डी लिमा म्हणाल्या की, कोविड निर्बंध कमी केल्याने परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. ग्राहकही खर्च करण्यास तयार आहेत. २०२२ मध्ये कंपन्यांनी विक्री आणि उत्पादनात आतापर्यंतचा सर्वात वेगवान विस्तार पाहिला. ही गती कायम राहिली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...