आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Pattern Of Home Shopping Changed In The Epidemic, Developers Are Preparing Houses Outside The City, Because After Corona People Want To Avoid Overcrowding; News And Live Updates

कोरोनाकाळात बदलले घर खरेदीचे पॅटर्न:डेव्हलपर्स शहराबाहेर तयार करत आहेत घरे; कारण कोरोनानंतर लोकांना जास्त गर्दी टाळायची आहे

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनानंतर शहराबाहेर घरे घेण्याच्या प्रमाणात वाढ

कोरोनाकाळात मोठ्या शहरांमध्ये घर खरेदीचे पॅटर्न बदलले आहे. आता लोक गर्दीच्या ठिकाणी घरे घेण्यास नकार देत आहे. त्यामुळे डेव्हलपर्सदेखील शहराबाहरे घरे तयार करत आहे. कारण कोरोना महामारीची पार्श्वभूमी लक्षात घेता लोक बाहेर सुरक्षितेसाठी घरे घेण्याचा विचार करत असल्याचे प्रॉपर्टी कन्सल्टंट एनरॉकच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

कोरोनानंतर शहराबाहेर घरे घेण्याच्या प्रमाणात वाढ
अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2020-22 मध्ये पहिल्या सात शहरांमध्ये 1 लाख 49 हजार घरे लॉन्च करण्यात आली होती. त्यापैकी 58% घरे शहर हद्दीत सुरू करण्यात आली. तर गेल्या आर्थिक वर्षात ही आकडेवारी 51% होती. महाराष्ट्राच्या पुणे शहराबद्दल सांगायचे झाल्यास नवीन घराच्या लॉंचिंगच्या एकूण हिस्सापैकी 76% हिस्सा सीमावर्ती भागात होत्या. यामध्ये मुळशी, चाकण, पिरंगट, चिखली व इतर भागांचा समावेश आहे.

तर दुसरीकडे, मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनने (एमएमआर)मध्ये पनवेल, पालघर, वसई, विरार, बदलापूर, भिवंडी आणि डोंबिवली या शहरांमध्ये 67% नवीन घरे लॉन्च करण्यात आले. गेल्या आर्थिक वर्षात ही आकडेवारी या भागांत 60% होती.

राष्ट्रीय राजधानीत शहराबाहेर होत आहे घर खरेदी
देशाची राजधानी दिल्लीत पाहायचे झाल्यास आर्थिक वर्ष 2020-21 येथे 19 हजार 090 घरे तयार करण्यात आली. यातील 57% घरांची लाँचिंग शहर हद्दीत झाली तर उर्वरित घरे सोहना, सोहना रोड, ग्रेटर नोएडा वेस्ट आणि यमुना एक्स्प्रेस वे भागात करण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात ते 49% होते.

घर खरेदीदारांची पद्धत बदलत आहे
एनरॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट्सचे अध्यक्ष अनुज पुरी यांच्या मते, कोरोना महामारीची पार्श्वभूमी लक्षात भविष्यातील घरे खरेदीची पद्धत बदलत आहे. कारण लोक आता आरोग्य सुरक्षितेतला पसंती देत आहेत. त्यामुळे या वर्षात जास्तीत जास्त घरांची शहराबाहेर खरेदी केली जात आहे. आता ग्राहक ई-स्कूलींग, घरातून काम आणि सुरक्षेच्या दृष्टीने घर विकत घेत आहेत. अशा परिस्थितीत विकसक घर खरेदीदारांची मागणी लक्षात घेऊनही काम करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...