आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Power Crisis In China Is Serious, The Supply Of Smartphone gadgets Will Be Disrupted

मोठी जोखीम:चीनमध्ये वीज संकट गंभीर, स्मार्टफोन-गॅजेटच्या पुरवठ्यात अडथळा येणार, किमतीत वाढ शक्य

बीजिंग, लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • युरोप, अमेरिकेपासून आशियापर्यंत अडचण, जागतिक पुरवठा साखळी तुटू शकते

कोरोना महामारीनंतर ऊर्जेचे संकट अमेरिका, ब्रिटनपासून चीनपर्यंत विस्तारलेले दिसत आहे. मात्र, सर्व देशांत ही अडचण स्थानिक कारणांमुळे दिसते आहे. मात्र, याचा परिणाम लवकरच जागतिक पुरवठा साखळीवर दिसेल. सर्वात मोठे संकट शेजारी देश चीनवर दिसत आहे. येथे वीज संकट एवढे गडद झाले की, यामुळे सामाजिक अस्थिरता, आर्थिक मंदी आणि जागतिक पुरवठा साखळी तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

उ.चीनमध्ील काही राज्यांत लोक ब्लॅकआऊटशी झगडत आहेत. काही शहरांत वाहतूक सिग्नल बंद झाल्याने रस्त्यावर गोंधळाचे वातावरण आहे. अर्थव्यवस्थेलाही गंभीर ठेच बसली आहे.

अर्थव्यवस्था परिणाम
- चीनची अर्थव्यवस्था मंदावू शकते.
- या वर्षी चीनचा विकास दर ७.७% राहण्याचा अंदाज आहे, आधी ८.२% वृद्धीचा अंदाज होता.

संपूर्ण जगावर होणार परिणाम
- स्मार्टफोन, अन्य इलेक्ट्रॉनिक्सचा पुरवठा घटू शकतो, किमती वाढू शकतात.
- अॅपलचे सप्लायर एसन प्रिसिजननुसार, त्यांना उत्पादन रोखावे लागू शकते.
- जागतिक पुरवठा साखळीत चीन सर्वात मोठी भागीदार, येथे कारखाने बंद होणे पूर्ण चीनला अस्ताव्यस्त करू शकते.

वीजटंचाईची तीन मोठी कारणे
1. कोळसा,नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्याने वीज कंपन्यांनी उत्पादन घटवले.
2. काही प्रांतांत उत्सर्जन कमी करण्याच्या मानकांमुळे वीज उत्पादन घटले आहे.
3. निर्यात मागणी वाढल्याने मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांनी वर्षभराच्या कोट्यातील विजेचा आधीच वापर केला.

... दुसरीकडे, ब्रिटनमध्ये इंधनाची टंचाई गंभीर
ब्रिटनमध्ये मंगळवारी पेट्रोल पंपांवर लागलेल्या रांगात लोकांमध्ये मारहाण आणि भोसकण्याच्या घटना घडल्या आहेत. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी समोर येऊन देशाला संबोधित करण्याची मागणी केली जात आहे. त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी लोकांमध्ये विश्वास बहाल करण्यासाठी इंधनाच्या पुरवठ्यात सैनिकांना पाचारण न करण्याच्या त्यांच्या निर्णयावर टीका केली आहे.

अमेरिकेतही ट्रकचालकांचा तुटवडा, शाळा पुरवठा ठप्प
अमेरिकेतही अडचणी दिसत आहेत. तिथे खाद्यपदार्थ वितरक आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या कामगार आणि ट्रकचालकांच्या टंचाईचा सामना करत आहेत. शाळांना पुरवठा होत नाही.

बातम्या आणखी आहेत...