आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Price Of Sarki Flour Doubled In A Year; Milk Likely To Become Expensive; News And Live Updates

सेक्टर रिपोर्ट:वर्षभरामध्ये सरकी पेंडीची किंमत दुप्पट; दूध महाग होण्याची शक्यता; दुभत्या जनावरांचा चारा महागल्याने दूध उद्योगाचा खर्च वाढला

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेब्रुवारी 2020 मध्ये 1,522 रु. प्रतिक्विंटल होता भाव, सध्या 3,000 रुपये पार

खाद्यतेलांच्या किमती वाढण्याचा परिणाम दूध उत्पादनांवरही दिसत आहे. वर्षभरात सरकीच्या पेंडीचा भाव दुप्पट झाला आहे. याचा वापर दुभत्या जनावरांच्या मुख्य चाऱ्याच्या रूपात केला जातो. कृषी उत्पादन विश्लेषकांनुसार, सरकीच्या पेंडीच्या किमतीत तेजी आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सरकीच्या पेंडीचा भाव १,५२२ रु. प्रतिक्विंटल होता, हा आता ९८.५६% उसळीसह ३,००० रुपयांवर गेला आहे. महाराष्ट्रातील अकोला आणि कादी बाजारपेठेत याचा भाव २,९२५-३००० रु. आहे. मागणी-पुरवठा आणि खरीप पिकांचा पॅटर्न संकेत देत आहेत की, काही आठवड्यांत सरकीच्या पेंडीचा भाव कमी व्हायच्या ऐवजी वाढतील. २५% प्रथिनांमुळे सरकीच्या पेंडीचा उपयोग पशुखाद्याच्या रूपात होतो. देशातील डेअरी उद्योग शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करत असल्याने त्यांच्या खर्चात याचा अप्रत्यक्ष वाटा सुमारे ९% आहे.

कमोडिटी कन्सल्टंट केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले की, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाबसारख्या राज्यांत कापूस लागवड होते. सोयाबीन आणि भुईमुगासारख्या पिकांचे क्षेत्र वाढले आहे. अमेरिकी कृषी विभागाच्या(यूएसडीए) अहवालानुसार २०२१-२२ मध्ये कापसाचा जागतिक साठा ८.९३ कोटी गाठी(सुमारे २१८ किलो) राहण्याचा अंदाज अाहे. २०२०-२१ च्या तुलनेत १७ लाख गाठी कमी आहे. याउलट या हंगामात कापसाच्या जागतिक विक्रीत ११ लाख गाठी वाढण्याची शक्यता आहे. कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाने(सीएआय) चालू पीक वर्षात ३३० लाख गाठी कापूस वापराचा अंदाज आहे. गेल्या हंगामात राष्ट्रव्यापी २५० लाख गाठी कापसाचा वापर झाला होता.

८० लाख टनावर वापर

  • देशात वार्षिक ८०-९० लाख टन असते सरकीच्या पेंडीचे उत्पादन.
  • बहुतांश सरकीच्या पेंडीचा वापर देशातच होतो, केवळ ६० हजार टनाची निर्यात होते.
  • सरकीच्या पेंडीत सरासरी ६% तेल असते, हे जनावरांसाठी चांगले असेत.
  • देशात सरकी पेंडीचा सरासरी वार्षिक व्यवसाय ७,३०० कोटी रुपयांचा आहे. दूध उद्योग वार्षिक ६.७% वाढल्याने व्यवसायही वाढेल.

३,६०० पातळी लवकर
देशात पिकांच्या पेरणीचा कल आणि जगभरात कापसाची मागणी-पुरवठ्याची स्थिती पाहता दीड-दोन महिन्यांत सरकी पेंड ३,५००-३,६०० रु. प्रतिक्विंटल होईल.- अजय केडिया, संचालक, केडिया अॅडव्हायझरी

बातम्या आणखी आहेत...