आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भास्कर विशेष:सोन्याच्या तुलनेत चांदीच्या भावातवृद्धी अद्यापही कमी, तेजी राहील

नवी दिल्ली, मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोने-चांदी किमतीतील प्रमाण देतेय चांदीला वाढ
  • ग्रामीण व सणातील मागणीत चांदीला बळकटी मिळेल

चांदीच्या किमतींनी बुधवारी भलेही हजर बाजारात आठ वर्षे जुना उच्चांक प्राप्त केला आहे, मात्र अद्यापही या तेजीचा शेवट नाही. तज्ञांनुसार, अद्यापही चांदी सोन्याच्या तुलनेत कमी वाढली आहे. अशा स्थितीत याच्या किमतीत तेजी कायम राहील. याशिवाय ग्रामीण भागांतून येणारी आणि दिवाळी सणातील मागणीमुळेही या किमतींना बळ मिळेल.

एंजेल ब्रोकिंगचे डेप्युटी व्हाइस प्रेसिडेंट अनुज गुप्ता म्हणाले, सोने-चांदीच्या किमतीचे प्रमाण ७० च्या जवळ राहते. हे गेल्या महिन्यात ९३ पर्यंत आले होते. चांदी ६० हजारांवर पोहोचल्यावरही ही ८३ पर्यंत आली आहे. अशा स्थितीत सोन्याच्या किमती स्थिर राहिल्यास चांदीच्या किमतीत ७३ हजारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा आहे. कारण, या पातळीवर सोने-चांदीच्या किमतीचे प्रमाण ७० वर येईल. गुप्ता म्हणाले, चांदीच्या दागिन्यांची मागणी सर्वात जास्त गावांतून होते. या वेळी मान्सून चांगला राहण्याची अपेक्षा आहे. याशिवाय सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे अनेक लोक या वेळी सणात सोने खरेदी करणार नाहीत. त्यांच्यासाठी सोन्यानंतर दुसरा पर्याय चांदीचा असतो. यामुळे चांदीची मागणीही वाढेल. गुप्ता म्हणाले, या दिवाळीपर्यंत चांदी ७५ हजार रु. प्रति किलोचा स्तर स्पर्श करू शकते, जो आतापर्यंतचा विक्रम ठरेल.सराफा बाजाराचे तज्ञ अजय केडिया यांनी सांगितले की, सोने-चांदीत तेजी राहील. या वर्षी चांदी ७५ हजार पार होऊ शकते व पुढील वर्षी एक लाख रु. किलोपर्यंत गेली तरी आश्चर्य वाटायचे कारण नाही.

आंतरराष्ट्रीय कारणांमुळे किमती वाढताहेत

> कोरोना संसर्गामुळे चांदीचे प्रमुख उत्पादन लॅटिन अमेरिकी देशांतील खाणीत होऊ शकत नाही. त्यामुळे पुरवठा घटला आहे.

> सिल्व्हर इन्स्टिट्यूटनुसार, २०२० च्या पहिल्या सहामाहीत जगात चांदीच्या मागणीत १० टक्के वाढ झाली आहे.

> २०१९ मध्ये चांदीच्या पुरवठ्याच्या मागणीच्या तुलनेत ९७३ टन घट होती. २०२० मध्ये चांदीच्या खाणींतून पुरवठा ७ टक्के कमी होईल.

गेल्या आठ वर्षांत सोन्या-चांदीचे प्रमाण असे राहिले

२०१२ मध्ये चांदीने ७२,८०० चा विक्रम केला होता, तेव्हा सोने आणि चांदीच्या भावाचे प्रमाण घटून ३५ वर आले होते. त्यानंतर यामध्ये सुधारणा आली आणि २०१४ पासून २०१९ पर्यंत हे ७० च्या जवळपास राहिले. या वर्षी मार्चमध्ये हे प्रमाण ऐतिहासिक उंची १२७ वर गेले, मात्र तरीही प्रमाण घटून ८३ च्या जवळपास आले आहे.