आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:रुपयाची नीचांकी स्तरावरून उसळी, डॉलरच्या तुलनेत 10  पैशांनी मजबूत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसांच्या लक्षणीय घसरणीनंतर प्रादेशिक चलनांच्या वाढीमुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे मंगळवारी रुपया डॉलरच्या तुलनेत १० पैशांनी वाढून ७७.३४ वर बंद झाला. परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितले की, मागील सत्रात रुपया त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर गेल्यानंतर रिझर्व्ह बँकेनेदेखील हस्तक्षेप केला असावा. त्यामुळे शेअर बाजारातील घसरण आणि विदेशी निधी सातत्याने भांडवल बाजाराच्या बाहेर जात असताना रुपयाच्या मूल्यात मर्यादीत वाढ झाली.

चलन बाजारात रुपया ७७.२७ वर उघडला आणि ताे ७७.२० ते ७७.४५ मध्ये फिरला. त्यानंतर दिवस अखेर रुपयाचे मूल्य १० पैशांनी वाढून ताे ७७.३४ पातळीवर बंद झाला. साेमवारी रुपया डॉलरच्या तुलनेत विक्रमी ५४ पैशांनी घसरून ७७.४४ वर आला हाेता. मजबूत प्रादेशिक चलनांनी रुपयाला आधार दिला. काही दिवसांच्या विक्रीनंतर जोखीम भावनांमध्ये काही स्थिरता स्थानिक चलनाला मदत करू शकते, तर कच्च्या तेलाच्या किमती आणि निधी बाहेर जाण्याचा विपरीत परिणाम रुपयावर होऊ शकतो, असे एचडीएफसी सिक्युरिटीज संशाेधक विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...