आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Sensex Jumped 848 Points, Welcoming The Decline In The Number Of Covid Patients

सेनेक्सची उसळी:कोविड रुग्णसंख्या घटल्याचे बाजारात स्वागत, सेन्सेक्स 848 अंक उसळला

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर बाजाराने वळण घेतले

देशात कोविडच्या नव्या रुग्णसंख्येत घट आल्याचे देशातील शेअर बाजारांनी जोरदार स्वागत केले. गेल्या आठवड्यातील घसरणीत राहिलेल्या सेन्सेक्सने ८४८ अंकांची उसळी घेतली आणि गेल्या आठवड्यातील घसरणीची भरपाई केली. बँक शेअर्समधील बळकट मागणीने या तेजीला आणखी बळकटी दिली.

तीस शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स ८४८.१८ अंक उसळून ४९,५८०.७३ अंकावर बंद झाला. याच पद्धतीने एनसईचा निफ्टी २४५.३५ अंकांच्या तेजीसह १४,९२३.१५ अंकावर बंद झाला. सेन्सेक्स सोमवारी सकाळी गेला बंद भाव ४८,७३२.५५ च्या तुलनेत २५८ अंकावर ४८,९९०.७० अंकावर खुला झाला. यानंतर सेन्सेक्सने मागे वळून पाहिले नाही आणि सलग वधारत राहिला. दिवसभराच्या व्यवसायात सेन्सेक्सने ४९,६२८.४२ अंकांचा उच्च स्तरही पाहिला.सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये सर्वात जास्त तेजी इंडसइंड बँकेत पाहायला मिळाली. हा ७% हून जास्त तेजीसह बंद झाला. याशिवाय भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लि., अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह आणि अल्ट्राटेक सिमेंटमध्येही चांगली तेजी राहिली.

पुढे काय?
बाजार देशातील कोविड रुग्ण आणि कंपन्यांच्या निकालावर लक्ष ठेवेल. कंपन्यांचे आतापर्यंतचे निकाल खूप चांगले आले आहेत. लसीकरणाच्या आघाडीवरील बातम्याही बाजारावर परिणाम करतील. लसनिर्मितीसाठी आणखी जास्त फार्मा कंपन्या जोडल्याने धारणा चांगली झाली आहे. याच पद्धतीने कोविड रुग्णांत घसरणीचा दर आणि लसीकरणाची गती बाजारास पुढे जाण्याची दिशा निश्चित करेल. -सिद्धार्थ खेमका, प्रमुख, रिटेल रिसर्च, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस

या तीन कारणांमुळे शेअर बाजारात तेजी दिसली

देशात कोविडच्या नव्या रुग्णांची संख्या तीन लाखांपेक्षा कमी असणे. यात घट येईल,अशी आशा आहे.

बहुतांश कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीत वित्तीय निकाल चांगले राहिले.

अमेरिकी फेडनुसार, व्याजदर वाढणार नाहीत. यामुळे विदेशी गुंतवणूक बाहेरबाहेर जाण्याची चिंता कमी.

व्यावसायिकांचा बाजारात विश्वास परतत आहे
निफ्टीला आता पुढील रेझिस्टन्स १४,९६६-१५,०४४ च्या कक्षेत राहील. या रेंजला पार करण्यासाठी निफ्टी आपला सर्वकालीन उच्चांक(१५,४३२) पार करण्याच्या दिशेने पुढे जाईल. घसरणीत निफ्टीला १४,८२४-१४,८५० च्या कक्षेत एक चांगला सपोर्ट मिळू शकतो

बातम्या आणखी आहेत...