आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Sensex Nifty Has Gained 6% This Year, While The Rest Of The World's Markets Have Fallen 21%

शेअर बाजार:सेन्सेक्स-निफ्टी या वर्षी 6% वाढले,  जगातील इतर बाजार 21% घसरले

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचा बेंचमार्क सूचकांक सेन्सेक्स आणि निफ्टी-५० ने या वर्षी जगातील इतर बाजारांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. दोन्ही इंडेक्स २०२२ मध्ये आतापर्यंत ६% टक्क्यांपेक्षा वधारले आहे. यात बँक, तेल, गॅस, एफएमसीजी आणि सरकारी कंपन्यांच्या शेअरमधील उसळीचे मोठे योगदान आहे. मोतीलाल ओसवाल यांच्या रिपोर्टनुसार निफ्टी-१०० मध्ये टॉप १० शेअर्समध्ये अदानी एंटरप्राइझेस आणि अदानी ट्रान्समिशनसह अदानी ग्रुपच्या चार कंपन्या समाविष्ट आहेत. यात ५४-१३५% तेजी आली. ते २०१७-२२ दरम्यान अग्रणी ऑल राऊंड वेल्थ क्रिएटर्स म्हणूनही उभरले आहेत. इतर शेअरमध्ये सरकारी कंपन्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि कोल इंडियाही समाविष्ट आहे.

म्युच्युअल फंडांची एसबीआय, युनियन बँकांची शेअर खरेदी म्युच्युअल फंडांनी नोव्हेंबरमध्ये पीएनबी, बीओबी, आयओबीसारख्या काही पीएसयू बँकांनी आपली हिस्सेदारी घटवली. तर एसबीआय, कॅनरा बँक आणि यूबीआयमध्ये हिस्सेदारी वाढवल्याचे दिसले.

दोन दिवसांच्या पडझडीनंतर तेजी देशातील बाजारात दोन दिवसांच्या पडझडीनंतर सोमवारी तेजी दिसून आली. सेन्सेक्स ४६८ अंकांनी वाढून ६१,८०६ वर बंद झाला. निफ्टीत १५१ अंकांची वाढ झाली. तो १८,४२० वर बंद झाला. व्यवहारादरम्यान एका वेळी सेन्सेक्स ५०७ अंकांनी आणि निफ्टी १६३ पर्यंत उसळला होता. त्यांनी दिवसभरातील सर्वाधिक उंची ६१,८४५ आणि १८,४३२ ला स्पर्श केला.

बातम्या आणखी आहेत...