आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुल रन:​​​​​​​बजेटपासून तीन दिवसांमध्ये ३,९७० नी वधारला सेन्सेक्स, फार्मा आणि सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये जास्त तेजी

मुंबईएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • एनएसईच्या निफ्टीतही १,१५५.३५ अंकांची उसळी

संसदेत सोमवारी वित्त वर्ष २०२१-२२ चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाल्यापासून शेअर बाजारातील उसळीचा कल बुधवारपर्यंत सुरू राहिला. या तीन दिवसांत बीएसईच्या सेन्सेक्सने ३,९६९.९८ अंकांची(८.५८%) जोरदार वाढ घेतली. यादरम्यान एनएसईच्या निफ्टीतही १,१५५.३५ अंकांची(८.४७%) उसळी घेतली. सेन्सेक्स प्रथमच ५० हजारांवर बंद झाला आणि बीएसईवर एफएमसीजी आणि रिअॅल्टी निर्देशांकाशिवाय सर्व क्षेत्रांतील शेअर्समध्ये तेजी राहिली. सरकारी बँक आणि फार्मा निर्देशांकाने अडीच ते तीन टक्क्यांपर्यंत वाढ दिली. खासगी बँक आणि धातू निर्देशांक पावणेदोन टक्के वधारले. दुसरीकडे, रिअॅल्टी इंडेक्समध्ये ०.५ टक्के घसरण आली. विश्लेषकांनुसार, भारतीय बाजारातील सध्याच्या तेजीमागचे सर्वात मोठे कारण, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा(एफपीआय) पैसा आहे.

सेन्सेक्सने आठ सत्रे केली प्रतीक्षा

 • सेन्सेक्सने २१ जानेवारीला पहिल्यांदाच ५० हजारांची पातळी पार केली होती.
 • निफ्टीनेही २१ जानेवारीला पहिल्यांदा १४ हजारांची पातळी ओलांडली होती.
 • १४ हजाराेवर बंद होण्यात या बेंचमार्क निर्देशांकाला आठ सत्रे लागली.

सरकारी कंपन्यांकडे अडकलेले भांडवल बाजारात
सरकारने स्पष्ट केले की, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडे अडकलेले सुमारे ७.५-८ लाख कोटी रुपयांच्या भांडवलात एक मोठा वाटा हळूहळू बाजारात येईल. या दीर्घ अवधीत बाजाराला सपोर्ट मिळेल.
- प्रकाश दिवाण, विश्लेषक, अल्टामाउंट कॅपिटल यूके

सलग तेजीची कारणे

 • विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची मोठी गुंतवणूक
 • ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे कंपनीचे चांगले निकाल
 • जीएसटीचे अपेक्षेपेक्षा चांगले संकलन
 • पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा

बीएसईची स्थिती

 • १,७८९ शेअर्समध्ये तेजी राहिली, ११९८ शेअर्सची ट्रेडिंग घसरणीत बंद झाली.
 • १२६ कंपन्यांच्या शेअर्सनी ५२ आठवड्यांची सर्वात उंच पातळी प्राप्त केली
 • २ कंपन्यांचे शेअर्स आपापल्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीपर्यंत घसरले
बातम्या आणखी आहेत...