आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाच्या जीडीपीत ५३% हून अधिक भागीदारी असलेल्या सेवा क्षेत्रातील घडामोडी गेल्या महिन्यात १२ वर्षांमध्ये सर्वात वेगाने वाढल्या आहेत. मोठी मागणी असल्याने फेब्रुवारीत सेवा क्षेत्राचा पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) ५९.४ वर पोहोचला आहे. तो फेब्रुवारी २०११ नंतरचा सर्वाधिक आहे. जानेवारीत तो ५७.२ आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये ५१.८ वर होता. तो सलग १९ व्या महिने कायम होता. एसअँडपी ग्लोबल इंडियाच्या मासिक सर्वेक्षणाच्या आधारावर पीएमआय ५० च्या वर राहणे वाढीचा संकेत असतो. एसअँडपी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्समध्ये इकॉनॉमिक्स असोसिएट डायरेक्टर पॉलियान्ना डी लीमा म्हणाले, “सेवा क्षेत्राने जानेवारीत गमावलेली गती परत मिळवली. मागणी वाढल्याने आणि प्रतिस्पर्धी मूल्य निर्धारण धोरणामुळे आऊटपूटमध्ये १२ वर्षांची सर्वात तेजी बघायला मिळाली. यात इनपूट गुंतवणूक सुमारे अडीच वर्षांत सर्वात संथ गतीने वाढली.’ फेब्रुवारीत एसअँडपी ग्लोबल इंडिया कम्पोझिट पीएमआय आउटपूट इंडेक्सही ५९ वर पोहोचला.
सेवा प्रदात्यांची नवीन ऑर्डरची अपेक्षा वाढली {सर्व्हेत म्हटले की, सेवा प्रदात्यांचे नवे ऑर्डर फेब्रुवारीत वाढले. अनेक कंपन्यांनी म्हटले, स्पर्धात्मक किंमतीमुळे त्यांच्या विक्रीला आधार मिळाला. तरीही पूर्ण क्षमतेचा वापर न झाल्याने नोकऱ्या कमी वाढल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.