आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • The Share Of Diesel Vehicles In Passenger Vehicles Has Come Down From 58% To 15% In 7 Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्लेषण:डिझेल वाहनांचा प्रवासी वाहनांमधील वाटा 7 वर्षांत 58% घटून 15% वर, बीएस 6 मुळे अाणखी घसरणीची शक्यता

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीएस ६ ची अंमलबजावणी झाल्यावर डिझेल वाहनांच्या उत्पादन खर्चात हाेऊ शकते वाढ, स्वस्त इंधनाचा फायदाही संपुष्टात
  • मारुती सुझुकीचा सीएनजी, हायब्रीडकडे वळण्याचा निर्णय ठरताेय याेग्य

इतिहासात पहिल्यांदाच डिझेल, पेट्राेलची किंमत सारखी झाली अाहे. जून २०१२ मध्ये पेट्राेलच्या तुलनेत डिझेलची किंमत लिटरमागे ३२ रुपये कमी हाेती. अाता दाेन्ही इंधनांच्या किमती जवळपास एकाच पातळीवर अाल्या अाहेत. डिझेलच्या किमतीत सलग हाेत असलेली वाढ व पेट्राेलच्या किमतीमधील कमी झालेला फरक यामुळे स्थानिक कार बाजारात डिझेल वाहनांची मागणी अगाेदरच्या तुलनेत कमी हाेत हाेती. २०१२-१३ अार्थिक वर्षात देशातील प्रवासी वाहनांमध्ये डिझेल वाहनांचा वाटा ५८% हाेता. ताे २०१९-२० मध्ये कमी हाेऊन २९ टक्क्यांवर अाला. २०१९-२० च्या चाैथ्या तिमाहीत ताे कमी हाेऊन १५ टक्क्यांवर अाला. अाता बीएस-६ मुळे डिझेल वाहनांच्या किमतीत वाढ झाली असून डिझेलचे भावही पेट्राेलच्या समकक्ष झाल्याने डिझेल वाहनांची मागणी अाणखी कमी हाेऊ शकते. मारुती सुझुकीने डिझेल वाहनांच्या व्यवसायातून बाहेर पडून सीएनजी/ हायब्रीड वाहनांवर लक्ष केंद्रित करण्याचा घेतलेला निर्णय याेग्य ठरेल. काेराेना संपल्यानंतरी वाहन बाजारपेठेत सुधारणा हाेण्यास विलंब लागू शकताे.

डिझेल वाहनांचा बाजार हिस्सा अाणखी घसरण्याची शक्यता

अाताच्या बीएस ६ च्या काळात डिझेल वाहनांचा बाजार हिस्सा अाणखी कमी हाेऊ शकताे. वाहनांच्या किमतीतील वाढ व पेट्राेलच्या तुलनेत डिझेल स्वस्त नसल्याने डिझेल वाहनांना दुहेरी फटका बसणार अाहे. सध्या स्पर्धकांच्या तुलनेत मारुती सुझुकी चांगल्या स्थितीत अाहे. मारुतीचा पेट्राेल व डिझेल पाेर्टफाेलिअाे भक्कम अाहे. कंपनीने डिझेल वाहन व्यवसायातून बाहेर पडण्याचा अाधीच निर्णय घेतला अाहे. याशिवाय कंपनी हायब्रीड वाहनांवरही काम करत अाहे.

डिझेलच्या किमतींनी कशी घेतली उसळी

गेल्या अनेक शतकात डिझेल- पेट्राेलच्या किमती पहिल्यांदाच एकापातळीवर अाल्या अाहेत. यात डिझेलच्या किमतींचे विनियंत्रण करणे व अप्रत्यक्ष करात झालेली वाढ याचा समावेश अाहे.

पेट्राेल- डिझेल किंमत वाढीमुळे दुचाकींची मागणी वेग पकडणार
मे २०२० च्या अाधीच्या अाठवड्यात डिझेलवरील अबकारी शुल्क वाढवून लिटरमागे १३ रुपये व पेट्राेलवर प्रती लिटर २० रुपये केले. अनेक राज्यात पेट्राेलच्या तुलनेत डिझेलवर जास्त व्हॅट हाेता.

पेट्राेल - डिझेल किंमतीतील फरक कमी करण्यासाठी डिझेलच्या किमती विनियंत्रित करण्यात अाल्या. २०२० अार्थिक वर्षात डिझेलच्या किमती पेट्राेलच्या तुलनेत सरासरी ७ रुपये प्रति लिटरने कमी झाल्या.

बातम्या आणखी आहेत...