आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • The Sino US Dispute Could Fulfill India's Dream Of Becoming The World's Technology Hub

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:चीन-अमेरिका यांच्या वादातून पूर्ण होऊ शकते भारताचे जगातील तंत्रज्ञान हब होण्याचे स्वप्न

न्यूयॉर्क13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिनरिच फाउंडेशनने जारी केलेल्या अहवालात दावा

अमेरिका आणि चीनच्या वादातून भारताला जगातील तंत्रज्ञान हब होण्यात मदत मिळू शकते. मात्र, यासाठी भारत सरकारला लालफितशाही आणि सरकारी अक्षमतेसारख्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या अडचणी दूर कराव्या लागतील. अमेरिकी उद्योजक मार्ले हिनरिचद्वारे स्थापित हिनरिच फाउंडेशनने यासंदर्भात जारी केलेल्या अहवालात प्रस्तुत टिप्पणी केली आहे.

अहवालानुसार, अमेरिका आणि चीनमध्ये सुरू तंत्रज्ञान युद्धामुळे धोरणात्मक व्यावसायिक करारावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे कंपन्यांना आपल्या मॅन्युफॅक्चरिंग पुरवठा साखळीस कुण्या अन्य देशात िशफ्ट करावे लागत आहे. भारत या पुरवठा साखळीस आपल्या येथे आणून स्थापित करण्याच्या प्रकरणात सुस्थितीत आहे. फाउंडेशननुसार, सध्या या प्रकरणात अनेक बाबी भारताच्या बाजूने आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काही क्षेत्रांत पुरवठा साखळी ‘चायना फ्री’ करण्याचे आवाहन केले आहे. यासोबत भारत या क्वाड ग्रुपचाही सदस्य आहे, ज्यात भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानचा समावेश आहे. या चार देशांच्या नेत्यांनी या महिन्याच्या सुरुवातीस पहिली बैठक घेतली. चीनची वाढती आर्थिक आणि लष्करी ताकदीला कसे तोंड द्यायचे हा यामागचा उद्देश आहे. भारत आणि चीनमध्ये गेल्या १५-१६ जूनच्या रात्री सीमा संघर्षानंतर वाद उद्भवला होता. यानंतर दोन्ही पक्षांत तणाव निवळण्याचा प्रयत्न झाला.

चीनमधील प्लँट भारतात शिफ्ट करण्याला वेग
अॅपल इंक, अॅमेझॉन डॉट कॉम इंक आणि सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी, जी अनेक वर्षांपासून चीनवर अवलंबून होती, ती आपला मॅन्युफॅक्चरिंग प्लँट भारत आणि दक्षिण आशियात हलवत आहे. कंपन्या भारताच्या नव्या प्रॉडक्टिव्हिटी इन्सेंटिव्ह योजनांचा फायदा उचलू इच्छितात. भारतात रोजगार स्वस्त आहे. गेल्या वर्षी झालेल्या कोरोना उद्रेकानंतरही याला आणखी वेग दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...