आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Stock Market Could Hit An All time High Again In Six Months; Risk Reward Balance In Favor Of Investors; News And Live Updates

अंदाज:सहा महिन्यांत पुन्हा सर्वकालीन उच्चांक करू शकतो शेअर बाजार; रिस्क रिवॉर्ड बॅलन्स गुंतवणूकदारांच्या बाजूने

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निफ्टी 15,430 चा सर्वकालीन उच्चांक करू शकतो : आयसीआयसीआय डायरेक्ट

देशातील शेअर बाजार बऱ्याच बळकट स्थितीत असून येथे रिस्क-रिवॉर्ड बॅलन्स गुंतवणूकदारांच्या बाजूने आहे. आगामी महिन्यांत निफ्टी १५,४३० चा सर्वकालीन उच्चांक बनवू शकते. हा सध्या १४,६३४ वर आहे. अशा स्थितीत सेन्सेक्स ५१,५०० च्या पातळीवर असेल. आयसीआयसीआय डायरेक्टने एका नोटमध्ये गेल्या काही आठवड्यांत सेन्सेक्स आणि निफ्टीच्या सपोर्ट पातळीच्या विश्लेषणात हा अंदाज व्यक्त केला आहे. या नोटनुसार, गेल्या काही आठवड्यांत बेंचमार्क निर्देशांकात करेक्शन आले आहे, मात्र निफ्टी १४,२०० वर राहील. ही सपोर्ट पातळी या हिशेबाने महत्त्वाची आहे की, यादरम्यान देशात कोरोना महामारीची दुसरी लाट वेगाने पसरली.

नव्या रुग्णांची संख्या रोज ४ लाखांच्या जवळ पोहोचली आणि अनेक राज्यांत पुन्हा लॉकडाऊन लावले आहे. याआधी सेन्सेक्स,निफ्टीने फेब्रुवारीच्या मध्यात अर्थसंकल्पानंतर सर्वकालीन उच्चांक स्थापन केला होता. तेव्हापासून बेंचमार्क निर्देशांक नकारात्मक कलासह मर्यादित कक्षेत वर-खाली गेला. जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटजिस्ट व्ही.के. विजयकुमार म्हणाले, भारतीय बाजाराला जागतिक बाजाराचेही सपोर्ट मिळत आहे.

सेन्सेक्स चढ-उतारानंतर ६४ अंक कोसळून बंद
आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत स्थितीत सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसाच्या नीचांकी पातळीपासून वेगवान सुधारणा पाहायला मिळाली. मात्र, व्यवसाय समाप्तीवर हा ६३.८४ अंकांच्या(०.१३%) नुकसानीसोबत ४८,७१८.५२ वर बंद झाला. यासोबत सेन्सेक्समध्ये दिवसाच्या नीचांकी पातळीपासून ६९०.४५ अंकांची सुधारणा पाहायला मिळाली. सकाळी सेन्सेक्स ४२६.३५ अंकांच्या कमकुवत स्थितीसह ४८,३५६.०१ वर खुला झाला. मात्र, लवकरच ७५४.२९ अंक घसरून दिवसाच्या नीचांकी पातळी ४८,०२८.०७ ला स्पर्श केला. दुपारच्या सत्रात २.१० वाजेनंतर बाजारात खरेदीचा जोर सुरू झाला. सेन्सेक्सने दिवसाच्या नीचांकी पातळीपासून ८३५.१६ अंक सुधारून ४८,८६३.२३ चा इंट्रा-डे-हाय केला. व्यवसाय समाप्तीवर निफ्टीत ३.०५ अंकांची(०.०२%) किरकोळ वाढ दिसली.

मे महिन्यात स्पष्ट होईल पुढील दिशा
मेच्या मध्यापासून महामारीची दुसरी लाट थंड पडेल व स्थिती सामान्य होईल हे बाजार गृहीत धरत आहे. तसे झाल्यास बाजारात उसळी येण्याची पूर्ण शक्यता आहे. - व्ही.के. विजय कुमार, चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटजिस्ट,जियोजित फाय. सर्व्हि.
निफ्टी १४,२००ची सपोर्ट पातळी तोडेल हे ठामपणे सांगू शकत नाही मे महिना खूप महत्त्वाचा सिद्ध होत आहे. या महिन्यात ही पातळी न घसरल्यास तेजी दिसू शकते. - एस. रंगनाथन, रिसर्च हेड, एलकेपी सिक्युरिटीज

गुंतवणूकदारांसाठी १४,२०० खाली मोठी संधी
आयसीआयसीआय डायरेक्टने आपल्या नोटमध्ये स्पष्ट केले की, संपूर्ण देश कोरोना संसर्ग रुग्णसंख्या वेगाने वाढली असतानाही वारंवार निफ्टी १४,२०० ची सपोर्ट पातळी होल्ड करण्यात यशस्वी ठरला. देशातील बाजार आतून किती बळकट आहे हे यातून दिसते. मार्च २०२० पासून आतापर्यंत निफ्टीने कधीही ९% पेक्षा जास्त करेक्शन पाहिले नाही. गेल्या वर्षात यात सलग तीन आठवड्यांपासून जास्त कालावधीपर्यंत घसरणही आली नाही. या हिशेबाने जेव्हा कधी निर्देशांक १४,२०० पेक्षा खाली आल्यास यात खरेदी केली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...