आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबँक आणि आयटी शेअर्समध्ये नफावसूलीमुळे शेअर बाजाआत शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरण आली. सेन्सेक्स ४५३ अंक घसरुन ५९,९०वर बंद झाला. निफ्टीदेखील १३३ अंकांच्या घसरणीसह १७,८५९ च्या पातळीवर राहिले. उच्च चलनवाढ आणि चलनविषयक धोरण कडक करण्याच्या चिंतेमुळे बाजारात विक्रीचा दबाव होता. त्याच वेळी, परदेशी निधीची सलग तिसऱ्या दिवशी विक्री झाली. एनएसडीएलनुसार, तीन दिवसांत त्यांनी भारतीय बाजारातून ५,४६१.७४ कोटी रुपये काढले आहेत. शुक्रवारी त्यांनी १,३८८.६७ कोटी रुपयाची विक्री झाली. यापूर्वी गुरुवारी २,९७० कोटी आणि बुधवारी १,१०३.०७ कोटी रुपये काढले होते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमजोरीनेदेखील बाजार गडबडला. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे रिसर्च हेड विनोद नायरने सांगितले, ‘बाजाराला फेडच्या बैठकीच्या मिनिट्समुळे झटका लागला आहे. महागाई कमी करण्यासाठी अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने २०२३ मध्ये व्याजदरात आणखी वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. एफआयआयच्या विक्रीचा बाजार आधीच दबावाखाली आहे. देशातील प्रमुख आयटी कंपन्यांचे डिसेंबर तिमाहीचे निकाल पुढील आठवड्यात येणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.