आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • The Trend Of Ordering Meals Online At Home Is On The Rise In The Country,, Cloud Kitchen Market To Reach Rs 15,000 Crore By 2024

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रेंड:देशात ऑनलाइन घरी जेवण मागवण्याचा ट्रेंड वाढतोय, 2024 पर्यंत 15 हजार कोटी रुपयांची होईल क्लाऊड किचनची बाजारपेठ

अंकिका विश्वास10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पारंपरिक रेस्तराँच्या तुलनेत सोशल डिस्टन्सिंगची गरज क्लाऊड किचनमधून पूर्ण होतेय

कोरोना विषाणू संसर्गामुळे बहुतांश रेस्तराँ बंद आहेत, असे असतानाही देशात घरी ऑनलाइन जेवण मागवण्याचा ट्रेंड वेगाने वाढत आहे. घरी जेवण मागवण्यात लोक क्लाऊड किचनला सर्वात जास्त प्राधान्य देत आहेत. क्लाऊड किचन असे व्यावसायिक मॉडेल आहे, जिथे व्यावसायिक कुकिंगची सर्व सुविधा दिली जाते, मात्र तेथे जाऊन जेवण करण्याची जागा नसते. केवळ तेथून ऑनलाइन ऑर्डर दिलेल्या जेवणाचा पुरवठा केला जातो. रेडसीर मॅनेजमेंट कन्सल्टिंगनुसार, २०२४ पर्यंत ही बाजारपेठ १५ हजार कोटी रुपयांची होईल. २०१९ पर्यंत ही बाजारपेठ ३ हजार कोटी रुपयांची होती. कंपन्यांद्वारे केलेल्या सर्वेक्षणात २१ टक्के लोकांनी उत्तर देताना सांगितले की, लॉकडाऊननंतर त्यांच्याकडून ऑनलाइन जेवण मागण्यात वाढ होईल. बेन इंडिया कंझ्युमर प्रोडक्ट अँड रिटेल प्रॅक्टिसचे हेड जयदीप भट्टाचार्य म्हणाले, कोरोनामुळे बिगर आवश्यक आऊटडोर कामकाज कमी होईल, यामुळे क्लाऊड किचनची मागणी वाढेल. लॉकडाऊनच्या आधी हा ट्रेंड वाढत होता. मात्र, कोरोनानंतर ही तेजी कायम राहील. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचे एमडी रचित माथूर या ट्रेंडबाबत सांगतात की, लहान मेन्यू आणि फूड किटमुळे बाजारात हा व्यवसाय सुरक्षित राहील. आता बहुतांश अन्न सेवा व्यवसाय, ऑनलाइन डिलिव्हरी आणि क्लाऊड किचन व्यवसाय वाढवतील, यामुळे ते वेगाने सुधारणा करू शकतील. पारंपरिक रेस्तराँच्या तुलनेत ग्राहकांत सोशल डिस्टन्सिंगची आवश्यकता क्लाऊड किचन चांगल्या पद्धतीने पूर्ण करते. यासोबत या व्यावसायिक मॉडेलमध्ये खर्च कमी असतो, स्टाफ कमी ठेवावा लागतेा आणि याच्याशी संबंधित अन्य खर्चाचीही बचत होते.

लॉकडाऊनच्या घोषणेनंतर ऑर्डर व्हॅल्यू ५०-६०% वाढली

रेबेल फूडचे देशातील व्यवसाय प्रमुख राघव जोशी यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या घोषणेनंतर ऑनलाइन फूड ऑर्डर व्हॅल्यू ५० ते ६० टक्के वाढल्या आहेत. याचे मुख्य कारण, लोक घरात आहेत आणि पूर्ण कुटुंबासाठी जेवण ऑर्डर करत आहेत. लोक ऑनलाइन जेवण ऑर्डर करत असतील तर ही आमच्यासाठी सकारात्मक राहील. आम्ही आपला पूर्ण गुंतवणूक खर्च यावर खर्च करू.

बातम्या आणखी आहेत...