आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकी सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचे इतिवृत्त जाहीर होण्यापूर्वी बुधवारी गुंतवणुकदारांनी जोरदार विक्री केली. त्यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेली देशांतर्गत शेअर बाजारातील तेजी संपुष्टात आली. सेन्सेक्स ६३७ अंकांनी घसरला आणि ६१,००० च्या खाली ६०,७५७ वर बंद झाला. निफ्टीमध्ये १९० अंकांची कमजोरी होती. तो १८,१०० च्या खाली १८,०४३ वर बंद झाला. परदेशी फंडांनी भारतीय बाजारातून पैसे काढून घेतल्याने आणि रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक यासारख्या मोठ्या कंपन्यांचे समभाग घसरल्यानेही विक्रीचा दबाव होता. एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार, बुधवारी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून निव्वळ १,१०३.०७ कोटी रुपये काढले. बीएसईवरील सर्व १९ क्षेत्रीय निर्देशांक मेटल, रिअॅल्टी, ऊर्जा क्षेत्रातील विक्रीमुळे घसरले. विश्लेषकांच्या मते, जागतिक बाजाराच्या चिंतेमुळे देशांतर्गत बाजारात घसरण झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.