आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Virus Recovery And Prevention Efforts Will Ensure The Recovery Of The Economy

कोरोनाशी लढा:विषाणूचा संसर्ग आणि अटकावाच्या प्रयत्नांतून अर्थव्यवस्थेची पुनर्प्राप्ती निश्चित होणार

वॉशिंग्टन3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
कोरोना संकटाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम - Divya Marathi
कोरोना संकटाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम
  • कन्सल्टन्सी फर्म मॅकिंझीकडून रिकव्हरीच्या नऊ शक्यता व्यक्त

कोरोना विषाणू महामारी दुसऱ्या विश्व युद्धानंतर जगातील सर्वात मोठे आर्थिक संकट म्हणून समोर आले आहे. संपूर्ण जगासाठी कोट्यवधी लोक आणि सरकारे याचा सामना करणे आणि आपापली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी झगडत आहेत. विषाणूवर लवकर नियंत्रण न मिळवल्यास लाखो लोकांचा जीव जाईल. आतापर्यंत टाळेबंदीसह तो थोपवण्यासाठी जे उपाय अवलंबिले आहेत, त्यातून जागतिक मंदीचा धोका समोर दिसतो. परिणामी, सध्या जगासमोर दुहेरी संकटाचे आव्हान आहे. पहिले आव्हान लोकांचे जीव वाचवणे आणि दुसरे अर्थव्यवस्था आणि रोजगार वाचवणे आहे. अमेरिकी मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म मॅकिंझीने महामारीचा संसर्ग थोपवण्याच्या उपायांच्या आधारावर जागतिक अर्थव्यवस्थेसाठी वेगवेगळ्या स्थितीचा अंदाज व्यक्त केला आहे. फर्मच्या अहवालात सांगितले की, हे दोन फॅक्टर निश्चित करतील की, आगामी काळात अर्थव्यवस्थेची पुनर्प्राप्ती(रिकव्हरी) कोणत्या दिशेने होणार आहे. अहवालात विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात सरकारांच्या प्रयत्नांच्या आधारावर नऊ संभाव्य स्थिती तयार केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...