आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या वर्षी तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये मोठी घसरण झाली. डिजिटल जाहिराती कमी झाल्या. ई-कॉमर्समधून उत्पन्न घटले. आयफोनचे उत्पादन थांबले. आणि गुंतवणूकदारांचा विश्वास उडू लागला होता. २००८ च्या आर्थिक संकटानंतर तंत्रज्ञान उद्योगासाठी हे सर्वात वाईट वर्ष ठरले. अॅपल, अॅमेझॉन, अल्फाबेट (गुगल), मायक्राेसाॅफ्ट आणि मेटा (फेसबुक)चे एकूण बाजारमूल्य ३२० लाख कोटी रुपये कमी झाले होते. आता अनेक टेक कंपन्यांनी खर्च घटवून व्यवसायाचे नवे धोरण स्वीकारले आहे. काही कंपन्यांनी म्हटले आहे की, खर्च कमी करणे आणि प्रकल्प थांबवण्याचे ते मार्ग शोधत आहेत.
कर्मचाऱ्यांना मोफत बस आणि लाँड्री सेवांसारख्या चांगल्या सुविधा देणाऱ्या उद्योगासाठी हे नवे वळण आहे. अल्फाबेटचे मुख्य सुंदर पिचाई यांनी गुरुवारी सांगितले की, खूप विचारपूर्वक कंपनी गुंतवणूक करणार. कंपनी सर्व बाजूंनी विचार करेल असा विश्वास अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी गुंतवणूकदारांना दिला आहे. अॅमेझॉन खर्च कमी करण्याच्या उपायांवर काम करत असल्याचे सीईओ अँडी जेसी यांनी म्हटले आहे.
मेटाचे मार्क झुकेरबर्ग यांनी २ बुधवारी तज्ज्ञांशी चर्चा करताना इन्फ्रास्ट्रक्चर खर्च घटवणे आणि अनावश्यक प्रकल्प थांबवण्यावर चर्चा केली. गुरुवारी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मालकी असलेली कंपनीच्या शेअर्समध्ये २३ टक्के वाढ झाली होती. अॅमेझॉन, अल्फाबेट, मायक्रोसॉफ्ट आणि अॅपलचे शेअर्समध्येही स्थिरता आली. तरीही ताज्या निकालातून दिसते की, तंत्रज्ञान व्यवसायातील आव्हाने कायम आहेत. गुगलने त्यांच्या जाहिरात व्यवसायात दुसऱ्यांदा घसरणीची माहिती दिली. अॅमेझॉनचा क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि ई-कॉमर्स व्यवसाय मंदावला आहे. २०१८ नंतर आयफोनच्या विक्रीत सर्वाधिक घसरण झाल्याचे अॅपलने म्हटले आहे. मेटालाही झटका बसला आहे. गुगलचा व्यवसाय कमकुवत झाल्यानंतर पिचाईंनी सांगितले, कंपनी खर्चावर नियंत्रणासाठी अनेक उपाय करत आहे. फोन आणि इतर गॅजेट्समधून जास्त कमाई केली जाईल. क्लाऊड डिव्हिजनमधून नफा मिळवण्याचे प्रयत्न करणार. यूट्यूबचा व्यवसाय मजबूत केला जाईल. अॅमेझॉनचे जेसी यांनी सांगितले, कर्मचारी कपातीनंतर आतापर्यंत होणाऱ्या किराणा सामानाच्या मोफत डिलिव्हरीवर शुल्क लावण्यात आले आहे. जलदपणे वेअर हाऊस वाढवले जातील. अॅपलचे मुख्य अार्थिक अधिकारी लुका माएस्ट्री यांनी सांगितले, अनेक ठिकाणी खर्च कपात करत आहोत. याचे चांगले परिणाम दिसतील.
नियामक संस्थांचा दबाव कमी होईल तत्रज्ञान उद्योगावर नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्न करत असतात. मात्र, भविष्यात या प्रकारची कारवाई कमी होण्याची आशा आहे. उद्योगाने आतापर्यंत स्वत:ला नियामकांपासून वाचवले आहे. गेल्या आठवड्यात एका फेडरल न्यायाधीशाने मेटाला व्हर्च्युअल रिअॅलिटी स्टार्टअप खरेदीपासून रोखण्याचा फेडरल कमिशनची मागणी फेटाळली. गेल्या वर्षी संसदेत टेक कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या उत्पादनांना प्राधान्य देण्यापासून रोखण्यासाठी विधेयक सादर झाले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.