आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासौदीच्या अरामको Apple Inc.ला मागे टाकून जगातील सर्वात मौल्यवान कंपनीचा मान मिळवला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ, त्या मागचे कारण ठरले आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे अरामकोचे समभाग वधारले आणि महागाईमुळे टेक समभाग घसरले. सौदी अरेबियाची नॅशनल पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस (अरामको) कंपनी ही जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी आहे.
अरामकोचे मूल्य 2.42 ट्रिलियन डॉलर
सौदी अरामकोचे मूल्य शेअर्सच्या किमतीवर आधारित 2.42 ट्रिलियन डॉलर आहे. त्याचवेळी, अॅपलच्या शेअर्सच्या किमतीत गेल्या एका महिन्यात घसरण झाली आहे. यामुळे बुधवारी त्याचे मूल्यांकन 2.37 ट्रिलियन डॉलरपर्यंत घसरले. अॅपलने या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत ग्राहकांच्या मजबूत मागणीमुळे अपेक्षेपेक्षा चांगला नफा कमावला, तरीही कंपनीच्या शेअरच्या किमती घसरल्या आहेत.
Apple चे मूल्यांकन 3 ट्रिलियन डॉलर
या वर्षाच्या सुरुवातीला अॅपलचे बाजार मूल्य 3 ट्रिलियन डॉलर होते, जे Aramco पेक्षा जवळपास 1 ट्रिलियन डॉलर जास्त आहे. तेव्हापासून Apple चा स्टॉक 20% पेक्षा जास्त घसरला आहे, तर Aramco ने 28% पेक्षा जास्त वाढ मिळवली आहे. मात्र, अमेरिकन कंपन्यांमध्ये अॅपल ही सर्वात मोठी कंपनी आहे. दुसऱ्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन आहे, या कंपनीचा मार्केट कॅप 1.95 ट्रिलियन डॉलर आहे. तज्ज्ञांच्या मते, महागाईच्या चिंतेमुळे टेक स्टॉक्समध्ये यंदा घसरण झाली आहे.
अरामकोला महागाई आणि कमी पुरवठ्याचा फायदा
टॉवर ब्रिज अॅडव्हायझर्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी जेम्स मेयर म्हणाले की, "तुम्ही Apple ची तुलना सौदी अरामकोशी त्यांच्या व्यवसायाच्या किंवा मूलभूत गोष्टींच्या बाबतीत करू शकत नाही, परंतु कमोडिटी स्पेसचा दृष्टीकोन सुधारला आहे."
महागाई आणि कमी पुरवठा यामुळे याचा फायदा झाला आहे. Aramco चा निव्वळ नफा 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये 124% वाढून 110.0 अब्ज डॉलर झाला आहे. 2020 मध्ये तो 49.0 अब्ज डॉलर होता.
एसअँडपी 500 ऊर्जा क्षेत्रत 40% वाढ
ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे S&P 500 ऊर्जा क्षेत्र यावर्षी 40% वाढले आहे. ब्रेंट क्रूड, जे वर्षाच्या सुरुवातीला 78 डॉलर प्रति बॅरल होते, ते 108 डॉलर पर्यंत वाढले आहे. Occidental Petroleum Corp. या वर्षी S&P 500 मधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या समभागांपैकी एक आहे. यात 100% पेक्षा जास्त तेजी आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्याची किंमत 31 डॉलरच्या जवळ होती, जी आता 60 डॉलरच्या वर गेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.