आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Then Pay Attention To These 5 Things, Otherwise You Will Have To Face Difficulties

गृहकर्जाचे सर्व EMI संपले का:मग या 5 गोष्टीकडे अवश्य लक्ष द्या, नाहीतर तुम्हाला करावा लागेल अडचणीचा सामना

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वतःच्या हक्काच्या घरासाठी अनेक जण वर्षानुवर्ष मासिक ईएमआय भरून कर्जाची परतफेड करतात. परंतू गृहकर्जाचे सर्व हप्ते भरून झाल्यानंतर सर्व जण निश्चिंत होतात. आपली जबाबदारी संपली या आर्विभावात राहतात. मात्र, वेळीच सावधान होण्याची गरज आहे. नाहीतर तुम्हाला मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे गृहकर्जाचे सर्व हप्ते भरून झाले की, प्रत्येकाने पाच गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अर्थात होम लोन क्लोज करण्याच्या टीप्स समजून घेऊया.

मूळ कागदपत्र बॅंकेकडून परत घ्या

गृहकर्ज घेताना तुम्ही ज्या मालमत्तेची मूळ कागदपत्रे बँकेत गहाण ठेवलेली असतात. त्यामुळे कर्जाची परतफेड केल्यानंतर बॅंकेकडून ते कागदपत्रं जरूर घ्या, अलॉटमेंट लेटर, पजेशन लेटर, लीगल डॉक्युमेंट सेल डीड, बिल्डर-बायर अग्रीमेंट, सेल अग्रीमेंट आणि अन्य कागदपत्रांचा यात समाविष्ट असू शकतो.

नो ड्यूज सर्टिफिकेट मिळवा

जेव्हा तुमच्या घराचे गृहकर्ज पूर्णपणे फेडले जाईल. तेव्हा तुम्हाला बँक किंवा वित्तीय कंपनीकडून नो ड्यूज सर्टिफिकेट दिले जाते. कोणत्याही परिस्थितीत हे प्रमाणपत्र बँकेकडून घ्या. तुम्ही बँकेतून घेतलेली रक्कम पूर्णपणे परत केल्याचा हा पुरावा असतो. म्हणजेच मालमत्तेवर कोणाचाही हक्क राहात नाही.

धारणाधिकार (Lien) काढला की नाही, खात्री करा

जेव्हा कोणतीही बॅक गृहकर्ज देते. तेव्हा बँक किंवा कर्ज देणारी संस्था त्यात काही वेळा धारणाधिकार (Lien ) जोडते. म्हणजे तुमच्या मालमत्तेवरचा अधिकार सांगितला जातो. कर्ज पूर्ण झाल्यानंतर बँकेने धारणाधिकार काढला की, नाही हे निश्चितपणे तपासा. धारणाधिकार काढून टाकल्यानंतर तुम्ही तुमच्या मालमत्तेचे पूर्ण हक्कदार होता.

नॉन बोजा प्रमाणपत्र

नॉन-एन्कम्ब्रन्स प्रमाणपत्र हे एक फायदेशीर दस्तावेज आहे. याचा अर्थ मालमत्तेवर कोणतेही ​​​​​​नोंदणीकृत भार नाही. कर्जाची परतफेड केल्यानंतर सर्व परतफेडीचे तपशील भार प्रमाणपत्रात दिसतात. तुम्ही तुमची मालमत्ता विक्री करायला गेला तर खरेदीदार तुमच्याकडून बोजा प्रमाणपत्र मागतो.

क्रेडिट स्कोअर प्रोफाइल अपडेट करा

तुम्ही जर कर्जाचे हप्ते पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमचे क्रेडिट प्रोफाइल अपडेट करणे आवश्यक आहे. जर हे त्यावेळी झाले नसेल. तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर लक्ष ठेवा. ते लवकरात लवकर अपडेट करून घ्या.

बातम्या आणखी आहेत...