आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना काळात बहुतांश क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला आहे. मात्र, पोलाद उद्योग यापासून दूर आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या दिवसांत यामध्ये थोडा त्रास होता, मात्र आवश्यक वस्तूंत समाविष्ट असल्याने अल्पावधीत पोलाद कारखाने सुरू झाले. यादरम्यान निर्यातीत अचानक आलेल्या मागणीने लॉकडाऊनच्या नुकसानीची भरपाई केली. पोलादाच्या सलग वाढत्या मागणीमुळे या धातूच्या किमतीही वाढल्या आहेत. भारतीय इस्पात आणि लोक क्षेत्रातील आकडे एकत्र करणाऱ्या केंद्रीय संयुक्त प्लँट समितीच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जुलैदरम्यान देशात तयार पोलादाची एकूण निर्यात ४.६४ दशलक्ष टन राहिली. ही गेल्या वर्षीच्या या अवधीत झालेल्या १.९३ दशलक्ष टन निर्यातीपेक्षा दुपटीहून जास्त आहे. ४.६४ दशलक्ष टनांपैकी व्हिएतनाम आणि चीनने अनुक्रमे १.३७ दशलक्ष टन आणि १.३ दशलक्ष टन पोलाद खरेदी केले. विदेशांतून होणाऱ्या मागणीमुळे झारखंड टाटा स्टील, हेवी इंजिनिअरिंग कॉर्पाेरेशन(एचईसी) आणि बोकारो स्टीलसारख्या मोठ्या कंपन्यांच्या प्लँटमध्ये ९०-१०० टक्के क्षमतेने काम सुरू झाले आहे. छत्तीसगडमध्ये भिलाई इस्पात संयंत्राचे गेल्या साडेतीन महिन्यांतील उत्पादन वेग दुप्पट झाला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.