आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • There Will Be A New Classification Of Shares In January, In The New Year There Could Be Five Companies From Mid To Large Cap

भास्कर मार्केट रिपोर्ट:जानेवारीत शेअर्सचे नवीन वर्गीकरण होणार, नव्या वर्षात पाच कंपन्या होऊ शकतात मिडवरून लार्ज कॅप

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लार्ज कॅपमध्ये आल्यानंतर शेअर्समध्ये वाढते फंड गुंतवणूक आणि रोकडता
  • 11 स्मॉल कॅप कंपन्यांची बढती होऊन मिड कॅप श्रेणीत येतील

म्युच्युअल फंड कंपन्यांची संघटना अॅम्फी पुढील वर्षी पहिल्या आठवड्यात शेअर्सच्या वर्गीकरणाची यादी जारी करणार आहे. यामध्ये जवळपास पाच कंपन्यांना मिडकॅप श्रेणीतून लार्ज कॅप श्रेणीत बढती मिळण्याची अपेक्षा आहे. जवळपास ११ कंपन्यांचे शेअर स्मॉल कॅपवरून मिडकॅप श्रेणीत जाऊ शकतात. अॅम्फी कंपन्यांच्या सहा महिन्यांच्या सरासरी भांडवलाच्या आधारावर दर सहा महिन्यांत शेअर्सना तीन श्रेणीत स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅपमध्ये वर्गीकृत करतात. या वर्गीकरणाच्या आधारावर म्युच्युअल फंड कंपन्या यामध्ये गुंतवणूक करतात. आयसीआयसीआय सेक्युरिटीजकडून केलेल्या विश्लेषणानुसार, मिड कॅप श्रेणीच्या पाच कंपन्या पुढील बदलात लार्ज कॅपमध्ये जातील. यामध्ये सर्वात प्रमुख नाव येस बँकेचे आहे. कधी काळीत प्रमुख बँकांत समावेश असलेली ही बँक प्रवर्तकाच्या घोटाळ्यानंतर मोठ्या घसरणीचा सामना करत आहे. एक वेळ हा शेअर गडगडून ६ रुपयांहून खाली आला होता. मात्र, नीचांकी पातळीवरून आलेल्या उसळीने बँकेचे बाजार भांडवल वाढवले आहे. यामुळे ही पुन्हा लार्ज कॅपच्या दिशेने झेपावत आहे. येस बँकेशिवाय अदानी एंटरप्रायजेस, पीआय इंडस्ट्रीज, एचएएल आणि ज्युबिलिएंट फूडही लार्ज कॅप शेअर होण्याच्या समीप आहेत. असे असले तरी, डिसेंबरमध्ये कोणताही मोठा चढ-उजार होण्याच्या स्थितीत यापैकी काही शेअर बढती होण्यापासून चुकले. स्मॉल कॅपवरून मिड कॅपमधील संभाव्य कंपन्यांत लॉरस लॅब, इंडियामार्ट इंटरमेश, नवीन फ्लोराइन, डिक्सॉन टेक्नॉलाजी, आलोक इंडस्ट्रीज, एस्ट्रोजेनका फार्मा, दीपक नाइट्राइट, सुवेन फार्मा, ग्रॅन्युल्स इंडिया,एमसीएक्स यांचा समावेश होऊ शकतो.

मोठ्या श्रेणीत जाण्याचे फायदे काेणते?

> फायदे- इक्विटी फंडात सर्वात जास्त पैसा लार्ज कॅपमध्ये येतो. शेअर लार्ज कॅपमध्ये असेल तर त्यात आपोआप जास्त गुंतवणूक येऊ लागते.

> लार्ज कॅप कंपनीत खूप जास्त ट्रेडिंग होते. यामुळे लार्ज कॅप श्रेणीत समाविष्ट होताच संबंधित कंपनीची रोकडता वाढते.

बातम्या आणखी आहेत...