आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारपेठेतून संकेत:मंदी येणार नाही, महागाईही कमी होईल, डॉलर घसरेल

बर्नहार्ड वार्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

२०२२ मध्ये तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर्स, सरकारी रोखे, क्रिप्टोकरन्सी व रिअल इस्टेटमध्ये अंदाधुंद घट झाली. अगदी जोखीममुक्त कंपन्यांचे बाजारमूल्य अब्जावधी रुपयांनी घटले. सरासरी गुंतवणूकदारावर आघात झाला. तरीही अनेक गुंतवणूकदार नववर्षात पोर्टफोलिओला चिकटून राहतील. मॉर्गन स्टॅनले वेल्थ मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी लिसा शॅलेट म्हणतात, अमेरिकन शेअर बाजारातील चढ-उताराच्या दरम्यान मोठे नुकसान झाल्याचे वाटणारे फारसे लोक नाहीत. खरे तर महामारीनंतर लोकांच्या शेअर्सचे मूल्य अजूनही ५०% जास्त आहे. व्याजदरांबाबत फेड रिझर्व्हची भूमिका, कॉर्पोरेट नफ्यातील अनिश्चितता आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावण्याची चिन्हे यामुळे परिस्थिती अस्थिर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मॉर्गन स्टॅन्लेने २०२३ मध्ये एस. अँड पी. ५०० साठी ३,९०० चे लक्ष्य ठेवले आहे. बेंचमार्क निर्देशांक पुढील १२ महिने सपाट राहण्याची शक्यता आहे. एस. अँड पी. २३ डिसेंबरला ३८४४ वर बंद झाला होता. ब्लूमबर्गच्या मते, सरासरी अंदाजानुसार २०२३ च्या शेवटी एस. अँड पी. ४००९ वर असेल. काही अंदाज ३४०० ते ४५०० ची श्रेणी सूचित करतात.

१७ टक्के उसळी २०२३ अखेर एस. अँड पी. ५०० गेल्या शुक्रवारी बंद झालेल्या बाजारापेक्षा १७% वर बंद होईल, असे डॉइश बँकेचे यूएस इक्विटी आणि जागतिक धोरणाचे प्रमुख बंकिम चढ्ढा यांनी सांगितले. वर्षाच्या मध्यात घसरण होईल, पण डिसेंबरच्या अखेरीस बाजार पुन्हा उंचीवर जाईल.

कंपन्या गुंतवणूक करतील मॉर्गन स्टॅन्लेच्या शालेट यांचा अंदाज आहे की, अमेरिका मंदीच्या कचाट्यात राहणार नाही. ग्राहक खर्च करतील आणि अर्थव्यवस्थेतची घसरण टाळण्यासाठी कंपन्या गुंतवणूक करतील. कॉर्पोरेटच्या नफ्यात १० ते १५% घट झाल्यामुळे शेअरची किंमतही घसरल्याचे ते सांगतात. महागाईचा परिणाम नफ्यावर झाला आहे.

पेट्रोल-गॅसचे दर कमी होतील आशेची इतरही कारणे आहेत. डॉलर कमकुवत झाल्यामुळे भारत, ब्राझील यांसारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांची स्थिती सुधारेल, असा विश्वास शालेट यांना वाटतो. २०२३ मध्ये पेट्रोल, गॅस आणि खाद्यपदार्थांचे दर कमी होतील.

बातम्या आणखी आहेत...