आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारताची सध्याची आर्थिक स्थिती तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अलीकडच्या कृतींमुळे होम लोन म्हणजेच गृहकर्ज क्षेत्रात मोठा बदल आणला आहे. व्याज दर कमी झाले आहेत. त्यामुळे हप्त्यांचे व्यवस्थापन अधिक नियोजनपूर्ण पद्धतीने करण्याची हीच वेळ आहे.
बाजाराच्या एकंदर स्थितीत बदल होण्यास गृह कर्ज प्रकारात मागणीला मिळालेली चालना अतिशय महत्त्वाची ठरते. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी अधिकाधिक लोक कर्ज घेण्याकडे वळले आहेत. कारण लवचिक परताव्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे सरकारची ‘सर्वांसाठी घर अभियान’ या प्रधान मंत्री आवास योजना (पीएमएवाय) अंतर्गत काही योजनांमुळे सर्वसामान्यांना आपल्या स्वप्नातील घराची खरेदी सहज शक्य होणार आहे.
प्रामुख्याने साजेसे होम लोन निवडताना सुरुवातीला उपलब्ध असलेल्या भरमसाठ योजना नागरिकांना गांगरून टाकतात. अशा परिस्थितीत कर्जासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी काही आवश्यक घटक लक्षात ठेवले पाहिजेत.
मासिक हप्त्यांचे विश्लेषण केल्यानंतर, तुम्ही तुमच्या बचतीतून किती रक्कम डाऊन पेमेंटसाठी भरू शकता ते तपासा. त्यामुळे तुमची मुद्दल कमी होण्यास मदत होईल. कारण दीर्घकाळाकरिता एक रक्कम ईएमआय स्वरुपात तुमच्या खिशातून वळती होणार आहे हे लक्षात असू द्या. यामुळे तुमच्या व्याजाची रक्कम कमी राहण्यास मदत होईल.
गृह कर्जाचा विचार करता, होम लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी पैशाची बचत करण्याकडे कल राहू द्या. जेणेकरून कालांतराने आवश्यक असेल तेव्हा तुमच्या खिशात पुरेसे पैसे असतील.
होम लोनचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे मुद्दल रक्कम निश्चित करणे. जरी तुम्ही गृहकर्जाच्या रकमेसाठी पात्र ठरलात, तरीही विचार न करता कर्ज घेतल्यास तुमच्यावरील ईएमआयचा बोजा वाढू शकतो.
त्याचप्रमाणे काही विशिष्ठ वित्तीय संस्थांच्या पात्रता निकषाचा विचार करा. वेगवेगळ्या गृह वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे पात्रता निकष निराळे असतात. तरीही काही कंपन्यांचे गृह कर्ज पात्रता निकष मवाळ असतात. आजही सिबील स्कोअर, चांगल्या परताव्याचा रेकॉर्ड हे घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे सुरुवातीपासून या घटकांची काळजी घ्या. जेणेकरून हाऊसिंग फायनान्स कंपन्या (एचएफसी) कडून साजेसे व्याज दर मिळतील.
एचएफसी’कडून निश्चित करण्यात आलेला व्याज दर, कर्जाची किंमत आणि ईएमआय हे प्रामुख्याने एखाद्याच्या उत्पन्नावर आधारीत असतात. त्यामुळे सुलभ परतावा करण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न चांगले असावे लागते. कोणतीही मोठी उडी घेण्यापूर्वी तुमच्या ईएमआयचा अंदाज घेण्याचा सल्ला दिला जातो. घराचा निर्णय घेण्यापूर्वी चांगली रक्कम हातात जमा ठेवा. मासिक ईएमआय जाणून घेण्यासाठी तुम्ही गृह कर्ज ईएमआय कॅलकुलेटर चा वापर करू शकता.
त्यानंतर गृह वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून लवचिक होम लोन ईएमआय कालावधी देण्यात येतो. कर्जाचा परतावा कसा करायचा याकरिता तुमच्याकडे अधिक पर्याय उपलब्ध असतात.
मोठ्या प्रमाणावर वित्तीय संस्थांचे पर्याय उपलब्ध असले, तरीही एखाद्या संस्थेची निवड करण्यापूर्वी व्याज दर आणि ऑफर तपासणे रास्त ठरेल.
वित्त पुरवठा प्रक्रिया कमी वेळखाऊ आणि सुलभ असावी यासाठी अलीकडे लोकप्रिय एचएफसी’कडून पूर्व-संमत ऑफर वाढविण्यात आल्या आहेत. या ऑफर मालमत्तेवरील कर्ज, होम लोन इत्यादी काही वित्तीय उत्पादनांवर उपलब्ध आहेत. तुमचे नाव आणि संपर्क क्रमांक यासारखी माहिती पुरवून तुम्हाला सहज पूर्व-संमत ऑफर तपासता येतात. त्याचप्रमाणे स्वत:करिता चांगल्या डील मिळवता येतील.
भारतातील होम लोन प्रक्रियेविषयी सविस्तर बोलायचे झाल्यास जर एखाद्या व्यक्तीला आवश्यक दस्तावेज तसेच कठोर पात्रता निकषांची माहिती नसल्यास ते आव्हानात्मक ठरू शकते. तरीच हा पर्याय सुरक्षित असल्याने व्याज दर परवडणारे असतात. उपरोक्त पैलू लक्षात घेता सर्वात फायदेशीर कर्ज मिळविण्यात तुम्हाला मदत होईल.
हे चार महत्त्वाचे घटक ग्राह्य मानून बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड सारख्या वित्त पुरवठा पर्यायाचे होम लोन तपासा. घराची खरेदी करण्यासाठी हाय वॅल्यू लोन मिळवता येते. वास्तविक कर्ज देऊ करणारा हा पर्याय सुलभ होम लोन बॅलन्स ट्रान्सफरही उपलब्ध करून देतो. गृह कर्जासाठीचे निकष तसेच आजच अर्ज कसा करता येईल ते जाणून घ्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.